सर्व पशुसंवर्धन योजनांना केंद्र सरकार कडून १५ हजार कोटींचा निधी- वाचा सविस्तर
पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकार
ने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे.
पुणे : पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीची योजना पशुसंवर्धन विभागाद्वारे जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रसाप सिंह यांनी दिली.
केंद्र शासनाने गेल्या वर्षी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी दिली. मात्र या योजनेचा १५ हजार कोटींची निधी या वर्षी (२०२१-२२) देण्यात आला आहे. या विविध योजनांतर्गत दूध प्रक्रिया (आइस्क्रीम, चीजनिर्मिती, दूध पाश्चरायजेशन, दूध पावडर, इत्यादी), मांसनिर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, व्याज दरामध्ये ३ टक्के सूट देण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर (http://dahd.nic.in/ahdf) उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर (http://ahd.maharashtra.gov.in) लिंक देण्यात आलेली असून, या योजनेच्या मार्गदर्शक सूचना मराठीत प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
विविध उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केलेला आहे. सदर योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ घेता येईल.
प्रतिक्रिया
राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाचा पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी उपयुक्त असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– सचिंद्र प्रताप सिंह,
पशुसंवर्धन आयुक्त
संदर्भ :- agrowon.com
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या
मत्स्यपालन व्यवसायासाठी सदरच्या योजनेचा लाभ मिळू शकेल का
atpost digholamba ta ambajogai dist beed maharashtra