Agricultural Department : खरीप पीक धोक्यात शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’ ने मिळणार का संजीवनी…!

Agricultural Department : खरीप  पीक धोक्यात शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’ ने मिळणार का संजीवनी…!

 

मान्सून दाखल होऊन महिना झाला तरी राज्यात सर्वदूर असा पाऊसच झालेला नाही. त्यामुळे यंदा खरिपाचे काय होणार याबाबत शेतकरी चिंतेत आहे. अजून अनेक भागामध्ये खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता प्रशासनाकडून कृषी संजीवनी हा उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्य़े शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले जाणार आहे. ठाण्यासह उर्वरित राज्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या उपययोजना कशा अंमलात आणाव्यात याबाबत मार्गदर्शन राहणार आहे. कृषी संजीवनी सप्ताहात ठाणे जिल्ह्यामध्ये 1 हजार 636 प्रशिक्षण शिबीर, 557 प्रात्याक्षिके, तालुका आणि जिल्हास्तरावर 164 ऑनलाईनद्वारे कार्यशाळा, 223 शेतीशाळा, 342 शिवारफेरी, 1 हजार 431 किसान गोष्टींचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी यामाध्यमातून भरगच्च कार्यक्रम राहणार आहेत. आता याचा कितपत फायदा शेतकऱ्यांना होणार हे पहावे लागणार आहे.

कृषी संजीवनी सप्ताहाचा काय उद्देश?

प्रशासनाच्या माध्यमातून 25 जूनपासून या अनोख्या सप्ताहाला सुरवात होणार आहे. दरवर्षी उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबवले जातात यंदा मात्र पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांचे मनोबल वाढेल असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.यामध्ये कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी- कर्मचारी हे परिश्रम घेणार आहेत. गावनिहाय नियोजन करण्यात आले असून या दरम्यानच्या काळात तूर पीक लागवड तंत्रज्ञान, भात लागवडी पध्दती, तूर बीजप्रक्रिया, पिकांवरील कीडनियंत्रण, मुख्य कीड कशी ओळखावी याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

शेतकऱ्यांना काय फायदा होणार ?

शेतकऱ्यांना केवळ योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने उत्पादनात घट होते. याचा अभ्यास कृषी विभागाने केला असून उत्पादन वाढीच्याबाबतीत जे प्रयोग कृषी विभागाचे आहेत त्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पीक प्रक्रिया, मुल्यवर्धन, प्रक्रिया केंद्रांना भेटी, लागवडीसाठी मिनीकीट मोफत यासारखे उपक्रम राबवून कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे.

हे पण वाचा :-कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातही मान्सूनची हजेरी

अशी ओळखा खतांमधील भेसळ

सध्या खरीप हंगामाला सुरवात झाली असून खत आणि बियाणे विक्रीमधून शेतकऱ्यांच्या फसवणूकीच्या घटना वाढत आहेत. विशेषत: भेसळ खताचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे कृषक अॅपच्या माध्यमातून पीक उत्पादन, माती-परीक्षण, मिश्र खते बनवण्याची प्रक्रिया, घरच्या घऱी आता रासायनिक खतांमधील भेसळ ओळखणे, खताचा वापर याबाबत कृषक अॅप हे माहिती देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक तर टळणार आहेच पण इतरही अनेक फायदे होणार आहेत.

source :-tv9 marathi