अळंबी पीक लागवड

अळंबी पीक लागवड

 

अळंबी ही बुरशी वर्गातील फळ आहे याचा वापर खाण्यासाठी केला जातो. जगभरात २००० प्रकार असून त्यापैकी भारतात २०० प्रकारची लागवड होते. या मध्ये १० ते १२ प्रकारची अळंबी व्यवसाईक म्हणून लागवड केली जाते. भारतात बटन धिगरी, भाताच्या पेंढावर वाढणारी अळंबी प्रचलित आहे.


जमिनीचा प्रकार:

लागवडी साठी आवश्यक बाबी :-

१ ) जागेची निवड – धिगरीसाठी ऊन वारा व पाऊस या पासून स्वरक्षण होईल अशा निवाऱ्याची असते .या साठी मातीचा विटांची खोली,बांधकाम असलेली खोली, बांबूचा टाटा पासून बनवलेली खोली किंवा पाला पाचोळा पासून बनवलेली झोपडी मध्ये केली जाते.

२) अनुकूल वातावरण – या अळंबीच्या लागवडीसाठी २२ ते ३० से तापमान व ८५ ते ९० टक्के असावे. तसेच ४ री बाजूनी गोणपाट झाकून स्प्रेने पाणी दयावे. यामध्ये अळंबीची लागवड चांगली होते.

३) लागवडी साठी माध्यम – धिगरी ची लागवड शेतात पिकाची मळणी व पीक वळ्या नंतर पिकाचे काढ ( गहू, जवारी, बाजरी मका, कपाशी, तूर, उसाचे पाचट, नारळ व केळीची पाने, भुईमुगाचे टरफल) च्या वापर केला जातो

हवामान

लागवडीची पूर्वतयारी –

१) माध्यम – लागवडी साठी असणारे माध्यम चालू वर्षी भिजवलेले असावे. कंदाचे २ ते ३ से मी तुकडे केलेले असावे.

२) प्लॉस्टिक पिशवी – प्लास्टिक पिशवी वेगवेगळ्या स्वरूपाची वापरली जाते ही १०० गेज जाडीच्या ३५ X ५५ से.मी आकाराच्या प्लास्टिक पिशवायचा वापर करावा. मांडणी – अळंबी साठी लोखंडी बेड अथवा बांबूची मांडणी करून बेड टांगून ठेवणायासाठी छताला तार किंवा बाबू ने आधार देता येतो.

३) बियाणे – अळंबी चे बियाणे लागवडी पूर्वी १ ते २ तास भिजून नंतर त्याची लागवड करावी.तसेच फॉर्मॅलिन (जंतुनाशक ), बाविस्टीन (बुरशीनाशक ) निवोन ( कीटकनाशक ) या च्या पावसाळ्या पूर्वी आणून ठेवावे. लागवडीची पद्धत – कांडी चे २ ते ३ लांबीचे बारीक तुकडे करून पोत्यामध्ये भरून ८ ते १० से मी तास भिजत ठेवावे.

तसेच काढतील पाणी काढून पाण्याचा निचरा करावा. काडीचे निर्जंतुकीकरण करणे – भिजवलेले काढ ८० से तापमानाला ग्राम पाणयात १ तास बुडून ठेवावे. काढ निथळण्यासाठी सावलीत ठेवावे. ७.५ ग्राम बाविस्टीन ( बुरशीनाशक ) व ५० मिली फॉर्मॅलिन ( जंतूनाशक ) १०० लिटर पाणयात मिसळून त्यात कढाचें पोते १८ तास भिजत ठेवावे व नंतर पाण्याचा निचरा करावा.

पिकाची जात

धिगरी अळंबीचे वेगवेगळे प्रकार प्ल्युरोट्स कुळातील आहेत. साजर काजू (करड्या रंगाचे ), एवोस (गुलाबी रंगाची )

लागवड

१) बेड भरणे – काढ भरताना ५ ते ६ से मी जाडीचा काडीचा थर दयावा व त्यावर अळंबीचे बियाणे पसरवावे .बियांचे प्रमाण काढाच्या २ टक्के असावे. काढ व स्पॉन याचे ४ ते ५ थर भरावे. भरताना बियाणे थोडे दाबून घ्यावे नंतर पिशवीचे तोंड घट्ट बांधावे. पिशवीचा बाजूने सुईने किंवा टाचणीने ४० ते ५० छिद्रे पाडावीत. भरलेल्या पिशवाय निचऱ्याच्या जागेत मांडणीवर अळंबीच्या बुरशीच्या वाढीसाठी ठेवावे. यासाठी लागणारे तापमान २५ ते २८ अश से असावे.पांढऱया बुरशीची वाढ चांगली दिसून अली की प्लास्टिक ची पिशवी काढून टाकावी. बुरशी तयार होण्यास १० ते १५ दिवस लागतात .

२) पिकाची निगा – ढिगरीची प्लास्टिक पिशवी काढलेली बेड मांडणी वर योग्य अंतरावर ठेवावी. बेड ला दिवसातून २ ते ३ वेळा हलकी फवारणी करावीं.जमीन व भिंती वर पाणी फवारणी करून तापमान व हवेतील आद्र्रता नियंत्रित ठेवावी.चांगले उत्पादन मिळण्यासाठी हवा खेळती असावी. ३ ते ४ दिवसात बेडच्या भोवती अंकुर आलेले दिसून येतात व पुढे ३ ते ४ दिवसानी चांगले वाढ झालेली दिसून येताच मश्रुम काढणीस येतात.

रोग नियंत्रण

किडीचा बंदोबस्त होण्य्साठी मॅलीथिऑन किंवा निऑन ०.०२ टक्के (१० लिटर पाण्यात २ मिली ) या प्रमाणत फवारणी करावीं तसेच बेड वर फळे असताना फवारणी करू नये.

उत्पादन

पहिली काढणी पिशवी भरलाय पासून २० ते २५ दिवसात मिळते. खंडणी पूर्वी १ दिवस अळंबीला पाणी देऊ नये. यामुळे अळंबी कोरडी व तजेलदार राहते. अळंबीच्या कडा वाळणयापूर्वी काढणी करावीं. तसेच लहान मोठी अळंबी एकाच वेळी काढून घ्यावी. काढणी करताना देठाला पिरगाळून काढणी करावीं. दुसरे पीक काढावर घेण्या पूर्वी त्याच बेड वर हलका हात फिरवून घेऊन कुजलेले काढ काढून टाकावे व दिवसातून २ ते ३ वेळा फवारावे. ९ ते १० दिवसानी दुसरे पीक मिळते व ८ ते १० दिवसानी ३ रे पीक मिळते.

साधारण १ किलो वाळलेल्या काढाच्या बेड पासून ८०० गरम ते १ किलो ताज्या अळंबीचे उत्पादन मिळते. अळंबी साठवणूक – काढणी नंतर प्लास्टिक पिशवीत १ दिवस चांगली राहतें, फ्रिज मध्ये ३ ते ४ दिवस चांगली राहतें. अळंबीला मार्केट नसेल तार उन्हात चागंली वाळवून पॅकिंग करून ठेवल्येस ६ महिण्या पर्यंत चागंली राहतें.अळंबी पीक लागवड

संदर्भ:- agrowon.com

 

Leave a Comment