कृषी यांत्रिकीकरणासाठी २४० कोटींना मान्यता!

कृषी यांत्रिकीकरणासाठी २४० कोटींना मान्यता!

 
कृषी विभागातर्फे केंद्र सरकार आणि अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी राज्य सरकारने २४० कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. त्यापैकी ५६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास अनुमती दिली आहे.
शेतीशी संबोधित केंद्र सरकारच्या विविध योजनांची तसेच अन्य प्रकल्पांची अंमलबजावणी राज्य सरकार करते. केंद्र सरकारच्या योजनांचे कृती आराखडे अंतिम झाल्यानंतर वर्षात दोन टप्प्यांत निधी प्राप्त होतो. हा निधी टप्प्याटप्प्याने येत असतो. मात्र राज्यातील बहुतांश शेती ही हंगामनिहाय केली जाते. खरीप आणि रब्बी हंगामात ७५ टक्के क्षेत्र लागवडीखाली येते. त्यामुळे या हंगामासाठी पूरक बाबींची पूर्तता या दोन हंगामात करावी लागते. यामध्ये यंत्रे आणि अवजारांचा समावेश असतो. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे, यंत्रे खरेदीसाठी अनुदान, तसेच यंत्रे आणि अवजारे खरेदीसाठी बँकांना अनुदान अशा दोन घटकांची अंमलबजावणी करण्यात येते.
हे पण वाचा:- शेतकरी मित्रांनो आता जमीन मोजणी होणार ३० मिनिटांत…!

यंदाच्या दोन हंगामांसाठी ४०० कोटी

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२२-२३ या वर्षातील दोन हंगामांकरिता ४०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. तरतुदीच्या ६० टक्के निधी वितरणाचे अधिकार दिले आहेत. हा निधी महिना सात टक्के या प्रमाणे कृषी विभागास देण्यात येणार आहे. त्यानुसार २४० काटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.
संदर्भ:- ऍग्रोवोन

1 thought on “कृषी यांत्रिकीकरणासाठी २४० कोटींना मान्यता!”

Leave a Comment