बैल पोळा म्हणजे काय ? पोळा सणाबद्दल संपूर्ण माहिती

बैल पोळा म्हणजे काय ? पोळा सणाबद्दल संपूर्ण माहिती
 
आपल्या देशामध्ये अनेक सण साजरे केले जातात. आणि प्रत्येक सणाच वेगवेगळं महत्व आहे. अश्याच या सनांपैकी पोळा हा एक महत्त्वाचा सण आहे. शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाचा सण म्हणजेच “बैलपोळा “ हा सण आपले शेतकरी आणि त्यांच्या शेतात राबणाऱ्या बैला विषयी आहे. बैल पोळा हा सण श्रावण महिन्याच्या अखेरीस येतो. आपला शेतकरी राजा ह्या सणाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो.
आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील जास्तीत जास्त लोक हे शेती ह्या प्राथमिक व्यवसाय वर अवलंबून असतात. आणि जे लोकं शेती करतात. अशा लोकांचा संबंध बैलासोबत येतो. नांगरणी, पेरणी, वखरणी, अश्या प्रकारचीं अनेक कामे करण्यासाठी आपल्याला बैलाची गरज पडत असते. म्हणजे सर्व जगाचे पोट हे आपल्या देशातील बळीराजावर( शेतकरी बांधवांवर ) अवलंबून असते त्या शेतकऱ्यांसाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा असतो . बैल पोळा सणाच्या दिवशी वेगळीच मजा असते. बैल पोळा हा सण बैल व त्या बैलाचा मालक शेतकरी यांचे बैला विषयी चे मार्मिक असे नाते स्पष्ट करणारा असा हा सण आहे. बैल पोळा हा सण बैला विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.
बैल हे शेतकऱ्याला वर्षभर शेती च्या कामाला मदत करत असतात. आपण बैलाची अनेक नावे ठेवलेली आहे. जसे; सर्जा – राजा, रिंगी – शिंगी , ढवळा – पवळा , सर्जा- राजा, रामा व शामा अशी अनेक नावे बैलाची असतात. आयुष्यभर शेतकऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या बैला साठी आणि शेतकरी बांधवांसाठी बैल पोळा हा सण खूप महत्वपूर्ण सण असतो. हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व जल्लोसात साजरा केला जातो.
 
बैलपोळा सण कसा साजरा करतात
मित्रानो पोळा हा सण खालील प्रमाणे साजरा करण्यात येतो. मित्रानो पोळा हा बैलांचा विशेष सण असल्यामुळे पोळा या सणाच्या एक दिवस आधी सकाळी सर्वजण आपल्या बैलांना आमंत्रण देण्याची प्रथा असते. मित्रानो बैल पोळा हा सण आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वपूर्ण सण असतो.
पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या बैलांना नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन त्यांना साबण किंवा निरमा लावून स्वच्छ पने धुण्यात येत असते.बैलांची छान पने आंघोळ घालण्यात येत असते. त्यानंतर बैलांना गोठ्यात किंवा ज्या ठिकाणीं त्यांना बांधतात त्या ठिकाणीं आणतात. आणि बैलांना चारा खाऊ घालत असतात.
पोळा या सणाच्या दिवशी आपल्या बैलांना संपूर्ण दिवसभर आराम करून देण्यात येत असतो. म्हणजे बैलासाठी हा एक महत्वपूर्ण असा सण असतो ज्या दिवसी त्यांच्याकडून कोणतेही काम करून घेण्यात येत नाही.
आता बैलांची अंघोळ झाल्यानंतर त्यांच्या  शिंगांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावले जातात व बैलांच्या खांद्यांना तुपाने किंवा तेलाने हळद लावली जाते. व त्यांचे शिंग खूप छान दिसेल अशे बनविण्यात येत असते. त्यांच्या शींगा मध्ये खोबळे लावतात. ते छान अश्या कलर चे असतात. पोळा या सणा मध्ये बैलांची सजावट ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. प्रत्येक जण आपल्या बैलाची जोडी चांगली कशी सजवता येईल हे पाहत असतो.
आता बैलांच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारचे चित्र, वेगवेगळ्या रंगाने काढले जात असतात. त्यांना झुल घालण्यात येत असते. झुल ही कापडाची, मखमलीची वेगवेगळ्या रंगाची असते. झुल घालण्यात आल्या नंतर बैल हे खूप छान दिसतात. बैलांना माळा घुंगार, फुगे बांधतात.
त्याच बरोबर बैलांना पोळ्या च्या दिवसी नव नवीन वेसण ,नवीन कासरा, नवीन झुला, नवीन कासरे व काही जण मोराची पीसारे लावून बैलाला साजवत असतात. प्रत्येक शेतकरी हा बैला ला आप आपल्या परीने चांगल्या पद्धतीने सजवण्याचा प्रयत्न हे करत असतात. त्यानंतर आपल्या बैला ला नैवद्य म्हणून गोड पुरणाची पोळी व इतर छान बनवलेले जेवण नैवद्य म्हणून देतात.
त्यानंतर बैलाला ओवाळणी घालून त्यांची पूजा करण्यात येत असते.
आपल्या प्रत्येक गावाच्या सीमेजवळ मिरवणूक ही काढण्यात येत असते त्या मिरवणुकीत गावातील सर्व लोकांच्या बैल जोड्या येत असतात. तसेच वाजंत्री, ढोल ,ताशे वाजवून गावातील सर्व बैल एकाठीकानी जमा करतात. आणि पोळा भरवतात.
आता गावा मध्ये ज्या ठिकाणी पोळा भरतो त्या ठिकाणी तोरण बांधण्यात येत असते.आता गावातील पाटील किंवा ज्याला पाटलाचा मान असतो तो व्यक्ती तोरण तोडून गावातील भरलेला पोळा फोडत असतो. त्या नंतर आरती झाल्या नंतर सर्वांना उंडा वाटण्यात येत असतो. सर्वजण ते घरी आणत असतात. पोळा सणाच्या दिवशी म्हणी, उखाणे म्हणत असतात. आणि पोळ्या मध्ये लोकांचा उत्साह वाढवत असतात. आणि हर हर महादेव असे म्हणत असतात.
पोळा या सणाच्या दिवशी संपूर्ण गावातील आपल्या घरांना देखील सजावट केली जातात. आता पोळा फुटल्यानंतर बैल मालक बैलाला घेऊन शेजारी पाजारी यांच्या घरी घेऊन जात असता. ते शेजारी बैलाची पूजा करून ओवाळणी घालून बैलाला नैवद्य लावत असतात. आणि याच पोळा या सणाच्या दिवशी सर्वजण आपल्या राख्या तोडून तोरण वरून टाकत असतात.
पोळा या सणाच्या दिवशी घरातील देव पाटावर मातीचे बैलं बनवून ठेवले जातात. पाटावर घरात मातीचे बनविलेले बैल ठेवलेले असतात व त्यांची ही पूजा केली जाते.
मित्रानो असे मानले जाते की पोळा या सणाच्या दिवशी बैलाला महादेव व पार्वती यांचे दर्शन होत असते. पोळा हा बैलांचा सण असल्यामुळे त्यांना या दिवशी दर्शन होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे आपल्या देशात पोळा या सणाला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. बैलाचे नाते हे शेतकऱ्यांशी घट्ट असते. बैल हे शेतकऱ्यांसाठी सर्जा राजा असतात.
अश्या पद्धतीने वर्षभर शेतकरी बांधवांसाठी कष्ट करणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी वर्षभर राबणाऱ्या तसेच शेतकऱ्याच्या प्रत्येक कामात त्यांना सात देणाऱ्या बैलाचा हा सण आहे. बैल हे शेतकऱ्यांसाठी खरा सोबती असतो.
 
हे पण वाचा :- सोयाबीन पिकाची काढणी, मळणी व साठवण तंत्र 2021
 
मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा
टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 
https://www.krushikranti.com/whatsapp-groups/

Leave a Comment