शेती बळकटी देण्यासाठी राज्यात “बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना”!

शेती बळकटी देण्यासाठी राज्यात “बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना”!
शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यात ‘’बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना ‘’राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली.
बागलाण तालुक्यातील अंबासन ,नामपूर ,टेंभे खालचे ,कऱ्हे आदी ठिकाणी शेती पाहणी दौरा तसेच सटाण्यात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती .त्याप्रसंगी भुसे यांनी उपरोक्त योजनेची घोषणा केली .याप्रसंगी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे ,पंचायत समिती सभापती इंदुबाई ढूमसे ,उपसभापती कान्हू अहिरे ,साहेबराव सोनवणे ,लालचंद सोनवणे ,जयप्रकाश सोनवणे ,डॉ.विलास बच्छाव ,डॉ.प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते .
शेती व्यवसाय भरभराटीला तरच शेतकऱ्याचे आर्थचक्र सुरळीत राहील हेच सूत्र डोळ्यापुढे ठेवून शेती व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आगामी पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यात ‘बाळासाहेब ठाकरे स्मारक योजना ‘’राबविण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री भुसे यांनी घोषणा केली.
या योजनेत शेतकऱ्याने पिकवलेला माल साठवण्यासाठी अद्ययावत गोदाम ,कोल्ड स्टोअरेज ,प्रक्रिया उद्योग आणि वाहतूक यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट राहणार असल्याचे नमूद करून या योजनेसाठी महिला शेती गट ,फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच शेती गटांना प्राधान्य राहणार असल्याचे कृषी मंत्री भुसे म्हणाले ,रासायनिक खतांच्या बाबतीत काही साठेबाजांकडून अफवांचे पिक पसरवले जात असल्याचे स्पष्ट करून राज्य मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध असुन शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून शासनाने कृषी विभागाकडे बफर स्टोक केला असुन बागलाण तालुक्यासाठी अतिरिक्त 500 मेट्रिक टन खते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे भुसे यांनी जाहीर करून शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहनही त्यांनी केले .
यावेळी पंतप्रधान सन्मान योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी महुसल यंत्रणेने तत्काळ आढावा घेण्याच्या सूचना भुसे यांनी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे यांना दिल्या .पिक कर्जाबाबत भुसे यांनी नाराजी व्यक्त करत जास्तीत जास्त शेतकर्यांना पिक कर्जाचा लाभ मिळेल यासाठी लक्षांक वाढविण्याचा सूचना भुसे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या .
मेंढ्यांना आपल्या भागात लंगडी नावाच्या आजाराची लागण झाली असुन त्याचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी तत्काळ लसीकरण मोहीम सुरु करण्याचे आदेश पशुधन अधिकाऱ्यांना दिलेत.यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी बागलाण तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील शेतकरी आहे .अर्ली द्राक्ष ,उन्हाळा कांदा ,डाळिंब ही पिके चांगल्या प्रतीचे उत्पादित करतात मात्र मार्केटिंगच्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते ही अडचण दूर करण्यासाठी बागलाण तालुक्यात या पिकांसाठी निर्यात केंद्र उभारण्यासाठी कृषी विभागाने चालना द्यावी अशी मागणी केली.
याप्रसंगी प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे ,तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील ,गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे ,उपविभायीय कृषी अधिकारी देवरे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार ,प्रणय हिरे ,सहाय्यक गटविकास अधिकारी काठेपुरी ,विस्तार अधिकारी नितीन देशमुख,भैया सावंत आदी उपस्थित होते. सुरुवातील भुसे यांनी अंबासन येथील शेती शाळेला भेट देऊन सीताफळ बागेची पाहणी केली. तसेच टेंभे खालचे येथे फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट दिली.
आता अर्ली द्राक्षाला अस्तरीकरणचा टेकू ………
अर्ली द्राक्षाला गारपीट आणि पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून शासनाने आता प्रायोगिक तत्वावर प्लास्टिक अस्तरीकरण करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री भुसे यांनी दिली .याचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असुन एकदाच या योजनेसाठी अर्ज करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले .तसेच अर्ली द्राक्ष हंगामाला विमा कवच असावे म्हणून आमदार बोरसे यांनी केलेल्या मागणीचा विचार शासन स्तरावर सुरु असुन लवकरच वर्ष भारासाठीच्या विम्यात त्याचा समावेश करण्याबाबतचे सुतोवाच भुसे यांनी केले.तसेच अर्ली द्राक्ष निर्यात धोरण ठरविण्यासाठी या आठवड्यात निर्यातदार ,अधिकारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येणार असुन या बैठकीत अर्ली द्राक्ष उत्पादनाबाबत मार्गदर्शन देखील तज्ञांकडून केले जाईल असेही त्यांनी सांगितले.
ref:- https://www.lokmat.com/

विशेष जाहिराती

नवीन जाहिराती

Leave a Comment