आरोग्यासाठी चांगले असलेलं ड्रॅगन फ्रुट

आरोग्यासाठी चांगले असलेलं ड्रॅगन फ्रुट

 
krushi kranti : गुलाबी-जांभळट दिसणारे ड्रॅगन फळ (dragon fruit) तुम्ही कधी खाल्ले आहे? या फळाला पिताया असेही म्हणतात. हे फळ पाहताना विचित्र वाटेल पण ते खूप चवदार असते. प्रथम मेक्सिको, दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेत याची लागवड केली जात होती, परंतु आता भारतातही त्याची लागवड केली जात आहे.
हे फळ रोग प्रतिकारशक्ती वाढते (Increases immunity) व पांढर्‍या पेशींचे प्रमाण वाढते (Increases the amount of white blood cells). यामुळे ड्रॅगन फ्रुट कोरोना आजारावर लाभदायी (Beneficial on dragon fruit corona disease) आहे.
हे पीक (crops) कमी खर्चात येत असल्याने व आरोग्यासाठी लाभदायक असल्याने बाजारात मागणी जास्त आहे. कमी खर्चात देखील चांगले उत्पन्न मिळत असल्याने बरेच शेतकरी ड्रॅगन फ्रुट लागवड कडे वळत आहेत. महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच हैदराबाद व नांदेड या ठिकाणी बाजारपेठेत चांगला भाव मिळतो.
हे पण वाचा:- ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती
या फळाचे सेवन करण्याच्या फायद्यामुळे त्याला ‘सुपरफूड’ असेही म्हणतात. वास्तविक, यात कमी कॅलरी आहे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म देखील समृद्ध आहेत. याशिवाय, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि सोडियम सारख्या खनिजांमध्ये देखील समृद्ध आहे. चला या फळांचे सेवन करण्याच्या फायद्यांविषयी जाणून घ्या …

ड्रॅगन फळ फायदे (dragon fruit benefits) 

  • ड्रॅगन फ्रुट हे मधुमेह, संधिवात, कर्करोग आणि दमा इत्यादी आजार नियंत्रित करते.
  • शरीरातील हानीकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
  • अन्न पचन शक्ती वाढते.
  • यामध्ये जीवनसत्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.\तसेच या फळांपासून जॅम, आईस्क्रीम, जेली आणि वाइन सुद्धा बनविता येते.
  • सौंदर्यप्रसाधनांमध्ये फेस पॅक म्हणून तुम्ही याला वापरू शकता.
  • डेंग्यू व मलेरियाच्या आजारात ड्रॅगन हे फळ खाल्ले जाते.
  • हे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक क्ती वाढते व पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.

हे पण वाचा:- ड्रॅगन फ्रुट अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज , वाचा सविस्तर!

Leave a Comment