Beware of Kusum Solar Pump Scheme fraud : कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन अर्ज करताय तर सावधान!

Beware of Kusum Solar Pump Scheme fraud : कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन अर्ज करताय तर सावधान!

 

कुसुम सोलर पंप ( kusum solar ) योजनेचा ( kusum mahaurja ) नवीन अर्ज करू इच्छिणाऱ्या व पैशाचा भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना महाऊर्जा  Mahaurja चा सावधानतेचा इशारा. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय कुसुम कृषी सौर पंप योजना राबवत आहे.

प्रधानमंत्री कुसुम सौर ( pm kusum scheme ) योजनेच्या नावाखाली सौर पंपा साठी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी महाऊर्जा कडून शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन.

प्रधानमंत्री कुसुम सोलर साठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर कुसुम योजनेच्या संबंधातील फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.

महाऊर्जा विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या फसव्या संदेशांबद्दल सायबर सेल मध्ये तक्रारी केल्या आहेत.

त्यात काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल application तसेच दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली सौरपंप मिळण्यासाठी अर्ज ( kusum solar online application ) करण्यास व नोंदणी शुल्क आणि सौरपंपाची किंमत ऑनलाइन भरणा ( kusum mahaurja payment ) करण्यास सांगितले जात आहे.

अशा खोट्या संकेतस्थळासह मोबाईल ॲपला प्रतिसाद देऊ नका, तसेच फसव्या दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीवरील प्रलोभनाला बळी पडू नका, अशा संकेतस्थळावर, ॲप वर ऑनलाईन पद्धतीने पैसे भरु नका, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक विकास रोडे यांनी केले आहे.

हे पण वाचा:- Onion prices rose : कांद्याचे भाव वाढले, दर ५० रुपये किलोच्या पुढे जाण्याची शक्यता..!

‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ शासनाच्या महाऊर्जा विभागामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी महाऊर्जाच्या अधिकृत संकेतस्थळावरच भेट द्यावी.

ओरिजनल वेबसाईट लिंक खालील प्रमाणे 

https://www.mahaurja.com/meda/

अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय, सिटी सर्व्हे न. 11149, शॉप न.305, तिसरा मजला, साई ट्रेड सेंटर, रेल्वेस्टेशन रोड,औरंगाबाद फोन. 0240 -2653595 ई-मेल :- domedaabad@mahaurja.com येथे संपर्क साधावा, असे आवाहनही विकास रोडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

source:- Prabhudeva GR & sheti yojana