केंद्र सरकारचा मोठा निर्णय ‘एकात्मिक फलोत्पादन विकास’ अभियानासाठी निधी मंजूर

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ‘एकात्मिक फलोत्पादन विकास’ अभियानासाठी निधी मंजूर

 
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी For the economic progress of the farmers राबवण्यात येणाऱ्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानासाठी २२५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारचा मोठा निर्णय कृषी विभागानं (Department of Agriculture) मोठा निर्णय घेतला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान नेमकं काय ? What exactly is Integrated Horticulture Development Campaign?
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे २०१४-१५ पासून सुरु करण्यात आलं आहे. फळबागांच्या विकासासाठी (For the development of orchards) हे अभियान सुरु करण्यात आलं आहे. २२५० कोटी रुपयांचं वितरण विविध राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात येईल. २०१९-२० मध्ये ३२०.७७ दशलक्ष टन फळांचं विक्रमी उत्पादन २५.६ दशलक्ष हेक्टरवर घेण्यात आलं.

हे पण वाचा :-‘MahaDBT’ वर बियाण्यांचा देखील समावेश, शेतकऱ्यांना अर्ज कधी पर्यंत करता येईल ?

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा फायदा Benefit of Integrated Horticulture Development Mission
भारतात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा मोठा फायदा झाला आहे. या अभियानामुळे भारतातील फळ उत्पादनात वाढ झाली आहे. २०१४-१५ ते २०१९-२० मध्ये फळउत्पादनाची वाढ ९ टक्केवरुन १४ टक्क्यांवर गेली आहे. या अभियानाद्वारे उच्च प्रतीच्या फळांचं उत्पादन केलं जातं.
 
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची मोहीम Campaign to double farmers’ income
केंद्र सरकारनं २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्याअंतर्गत या अभियानाकडं पाहिलं जातं.
 
पीएम किसानचा आठवा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष ?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जे दर चार महिन्यांनी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. यावेळी १ एप्रिलपासून शेतकऱ्यांचा हप्ता थकीत आहे. कारण आधी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आठवा हफ्ता लांबणीवर पडला होता आणि आता कोविड -19 मुळे सरकार त्यांच्या नियंत्रणामध्ये व्यस्त आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाईन पेमेंट केले जाते. दिनांक ३१ मार्च २०२१ पर्यंत १०.८२ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सुमारे १,१६,२९२.९ कोटी रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत.
संदर्भ :- tv9 marathi
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment