शेतकऱ्यांसाठी म्हत्वाची माहिती : वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई; इथं करा अर्ज

शेतकऱ्यांसाठी म्हत्वाची माहिती : वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई; इथं करा अर्ज

 
शेती आणि शेतकरी यांना अनेक अडचणींचा सामान करावा लागतो. अवकाळी पाऊस, गारपीठ तर कधी रोगराई यांचा सामना करावा लागतो. आता शेतकऱ्यांसमोर आणखी संकट उभे ठाकले आहे ते म्हणजे, वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीचे.
मानव आणि वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी वनविभागातर्फे नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आता वन्यप्राण्यांनी मानवावर केलेला थेट हल्ला असो की शेतमालाची केलेली नुकसान असो, त्यासाठी भरपाई मिळणार आहे.
हे पण वाचा:- कांद्याची मागणी वाढली; यामुळे वाढणार का कांद्याचे भाव? जाणून घ्या कारणे
वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यास भरपाई मिळणार आहे. यामध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तसेच हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांसाठी ४० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद केली आहे. यामध्ये प्रमुख्याने वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, हत्ती, मगर, रानकुत्री या प्राण्यांनी हल्ला केल्यास नुकसान भरपाई अथवा आर्थिक मदत केली जाते.

सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन

MAHARASHTRA FOREST DEPARTMENT (mahaforest.gov.in) या लिंकवर जाऊन सर्व माहिती द्यावी लागणार आहे.
source:- कृषी जागरण

Leave a Comment