रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत!

रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत!

 
रशिया-युक्रेन युध्दामुळे खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्याच बरोबर आता रासायनिक खताच्या दरात वाढच नाही तर रशियातून होणाऱ्या रासायनिक खताच्या आयातीवरच परिणाम होणार आहे. भारताला वर्षभर लागणाऱ्या खतापैकी 12 टक्के म्हणजेच दरवर्षी 70 लाख टन डीएपी खताचा पुरवठा केला जातो. यंदा मात्र, अद्यापपर्यंत ही आयातच झालेली नाही. त्यामुळे  खरीप हंगामात खताचा तुटवडा भासणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्य असेल तेवढेच व खरीप हंगामासाठी गरजेनुसार आवश्यक खत खरेदी करुन ठेवावे असे आवाहनच करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे अतिरिक्त वापर न करता शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत तपासूनच खताचा वापर केला तर उत्पादनात वाढ आणि खर्चही कमी होणार आहे.

साठा मुबलक पण खरेदी गरजेनुसारच

उन्हाळी हंगामातील पिके ही अंतिम टप्प्यात आहेत. काढणी झाली की खरीप हंगामाची लगबग सुरु होते. शेती मशागतीची कामे सुरु असतानाच मे महिन्यापासून खताची विचारणा करण्यास सुरवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऐन गरजेच्या वेळी मागणी न करताच आताच लागेल त्या अनुशंगाने खताची खरेदी करणे गरजेचे आहे. तरी सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यातील सर्वच कृषि सेवा केंद्रात मुबलक खत साठा उपलब्ध असून, येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांची खरेदी करुन आवश्यक खताचा साठा करुन ठेवावा.जेणेकरुन रशिया व युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर ऐन हंगामात खतांचा तुटवडा भासणार नाही असे कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी सांगितले आहे.

असे करा खताचे नियोजन

माती परिक्षण करुन पिकाच्या गरजेनुसार खताचा वापर करावा. यामुळे खताचा अतिरीक्त वापरही टळला जातो आणि उत्पादनातही वाढ होते. नांदेड जिल्ह्याचे सरासरी सोयाबिन पेरणी क्षेत्र 4 लाख हेक्टर एवढे आहे. सोयाबीन पिकासाठी लागणारे सिंगल सुपर फॉस्फेट हे कॅल्शियम, स्फुरद, गंधक घटक असणारे खत सध्या उपलब्ध आहे. पण अजूनही रशियातून खताची आयात झालेली नाही. त्यामुळे भविष्यातील संकट ओळखून खताचा साठा हाच त्यावरचा पर्याय आहे.
हे पण वाचा:- ‘या’ दोन कागदपत्रावरच होणार ई-केवायसी

रशियातून अशी होते खताची आयात

दरवर्षी डीएपी आणि पोटॅश प्रत्येकी 10 लाख टन आणि एनपीके 8 लाख टन खातांची आयात हा एकट्या रशियामधून होत असते.परंतू सध्याच्या वातावरणामुळे खतांचा पूरवठा विस्कळीत होऊ लागला आहे. ही परस्थिती लवकर निवळली नाही तर सध्याच्या दरापेक्षा अधिकचे दर होतील असे केंद्र सरकारच्या माध्यमातूनच सांगण्यात आले होते. त्यामुळे खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी सिंगल फॉस्फेट सारख्या खताचा वापर करणे गरजेचे झाले आहे. एकंदरीत युध्दाचा परिणाम शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणवू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच खरिपाचे नियोजन करणे गरजेचे आहे.
source:- tv9 marathi

Leave a Comment