केंद्र सरकारची; मंजुरी आता शेतकऱ्यांना मिळणार कर्ज १० वर्षे सवलतीने वित्तसाह्य करणारी देशव्यापी योजना

केंद्र सरकारची; मंजुरी आता शेतकऱ्यांना मिळणार कर्ज १० वर्षे सवलतीने वित्तसाह्य करणारी देशव्यापी योजना
coronavirus : सामूहिक सुविधांसाठी शेतकऱ्यांना कर्ज , १० वर्षे सवलतीने वित्तसाह्य करणारी देशव्यापी योजना
नवी दिल्ली : कृषि आधारित पायाभूत सुविधांची उभारणी व शेतीसाठी सामूहिक सोयी – सुविधा उभारणी यासाठी बँका व अन्य वित्तीय संस्थांमार्फत. दीर्धकालीन मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचा एक स्वतंत्र निधी उभारण्याच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली .
या निधीतून एक देशव्यापी केंद्रीय योजना पुढील १० वर्षे राबविली जाईल . बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की , या योजनेनुसार बँका व अन्य वितीय संस्था एक लाख कोटींचा वित्त पुरवठा करतील .
यंदा १० हजार कोटी रुपये व त्यापुढील तीन वर्षे प्रत्येकी ३० हजार कोटी रुपयांची कर्ज मंजूर केली जातील . याखेरीज दोन कोटी रुपयांपर्यंतच्या अशा कर्जदारांना ‘ एमएस इंसाठी असलेल्या ‘ क्रेडिड गॅरन्टी फंडा’तून कर्जहमीही मिळेल या हमीचे शुल्क सरकार भरेल , असेही तोमर म्हणाले .
कर्जफेडीची मुदत किमान सहा महिन्यानी व कमाल दोन वर्षांनी वाढविलीही जाऊ शकेल . ही योजना यंदापासून सन २०२ ९ पर्यंत राबविली जाईल . यामुळे शेती व शेतमाल प्रक्रिया उद्योगांना कर्जपुरवठा केला जाणार असल्याने यातून भागात फार मोठ्या प्रमाणावर नवे रोजगार उपलब्ध होतील , अशी सरकारची अपेक्षा आहे . केंद्र सरकारची
३ टक्के व्याज सरकार भरणार दोन कोटींपर्यंतच्या अशा कर्जावर ३ टक्के ‘ इन्टरेस्ट सबळेशन लागू असेल . म्हणजे कर्जदाराचे ३ टक्के इतके व्याज सरकार भरेल.ही सवलत जास्तीत जास्त सात वर्षापर्यंत लागू असेल . यासाठी सरकार खिशातून १०.७३६ कोटी खर्च करेल .
ref:- https://www.lokmat.com/

विशेष जाहिराती

नवीन जाहिराती

Leave a Comment