कापूस खत व्यवस्थापन

कापूस खत व्यवस्थापन

 
कापसाच्या शाश्‍वत उत्पादनासाठी २० ते २५ टक्के अन्नद्रव्ये ही शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खत, कंपोष्ट खत इ. सेंद्रिय खतांमधून देणे आवश्यक आहे.
यापैकी कुठल्याही सेंद्रिय खतासोबत (२ टन/एकर) रासायनिक खतांचा वापर केल्यास पिकाद्वारे अन्नद्रव्येही मोठ्या प्रमाणात शोषली जातात.
जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया केल्याने रासायनिक खतांमध्ये बचत होऊन त्यांनी उत्सर्जित केलेल्या जीवनद्रव्याने पिकाच्या वाढीवर अनुकूल परिणाम होतो.
एकरी उत्पादन समाधानकारक मिळण्यासाठी रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार योग्य पद्धतीने, योग्य वेळी व योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.
कापसासाठी शिफारस केलेल्या रासायनिक खताच्या मात्रा पुढीलप्रमाणे वापराव्यात (प्रति एकर) :
बी.टी. संकरित वाणाकरिता (जिरायती) – पेरणीच्या वेळी ८:२०:२० किलो नत्र, स्फुरद, पालाश याप्रमाणे १७ किलो युरिया, १२५ किलो एस.एस.पी., ३३ किलो एम.ओ.पी.; पेरणीनंतर ३० दिवसांनी १६ किलो नत्र याप्रमाणे ३५ किलो युरिया, पेरणीनंतर ६० दिवसांनी १६ किलो नत्र याप्रमाणे ३५ किलो युरिया द्यावा. एकूण ४०:२०:२० किलो नत्र, स्फुरद, पालाश आणि वेळोवेळी सम्राट प्लस/सम्राट ए.एफ./अंकुश/संग्राम/सुदर्शन/प्रिन्स/स्फूर्ती ४५/सुपर पॉवर/सोना प्लस/संग्राम लिक्वीड सिलिकॉन/संग्राम ड्रीप ह्या जैविक औषधांच्या वेळोवेळी फवारण्या कराव्यात.
बी.टी. संकरित वाणाकरिता (बागायती) – पेरणीच्या वेळी १०:२६:२६ किलो नत्र, स्फुरद, पालाश याप्रमाणे २२ किलो युरिया, १६२ किलो एस.एस.पी., ४३ किलो एम.ओ.पी.; पेरणीनंतर ३० दिवसांनी २० किलो नत्र पेरणीनंतर ४४ किलो युरिया, पेरणीनंतर ६० दिवसांनी २० किलो नत्र याप्रमाणे ४४ किलो युरिया द्यावा.
एकूण ५०:२६:२६ किलो नत्र, स्फुरद, पालाश त्याचप्रमाणे सम्राट प्लस/सम्राट ए.एफ./अंकुश/संग्राम/प्रिन्स/सुदर्शन/सुपर पॉवर/स्फूर्ती ४५/सोना प्लस/संग्राम लिक्वीड सिलिकॉन/संग्राम ड्रीप ह्या जैविक औषधांच्या वेळोवेळी फवारण्या कराव्यात. कापूस खत व्यवस्थापन

Leave a Comment