Cotton Rate : कापसाला ऐतिहासिक भाव शेतकरी मालामाल !
गेल्या काही दिवसांपासून कापूस उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. याचे कारण म्हणजे कापसाला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहेत. यामुळे शेतकरी समाधानी आहे. अकोट बाजार समितीमध्ये जे गेल्या 50 वर्षामध्ये झाले नाही ते यंदा घडले आहे. सोमवारी 11 हजार 845 असा विक्रमी दर मिळाला आहे. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाची विक्री केली. यामुळे योग्य साठवणुकीचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
असे असले तरी वाढत्या दराचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे बोलले जात आहे. वाढीव दर मिळवण्यासाठी सबंध चार महिने जे शेतकऱ्यांनी केले त्यापेक्षा महिनाभरात अधिकचा मोबदला हा व्यापाऱ्यांना मिळालेला आहे. व्यापाऱ्यांनी देखील यामध्ये डोकं लढवून त्याठिकाणी फायदा करून घेतला आहे. सध्या वाढलेली मागणी आणि घटलेला पुरवठा यामुळेच हे शक्य झाले आहे. अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी साठवलेला कापूस विकला आणि आता त्याचाच फायदा व्यापाऱ्यांना झाला आहे.
असे असताना आता या पुढील काळात हे दर टिकून राहतील किंवा यामध्ये वाढच होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी खरिपात सोयाबीनला पसंती दिली आहे. त्यामुळे सरासरी क्षेत्रापेक्षा कमी लागवड झाली होती. पण यंदाचे उत्पादन आणि मिळालेले विक्रमी दर यामुळे पुन्हा कापसाच्या क्षेत्रात वाढ होईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
हे पण वाचा:- ई-पीक पाहणीतूनच आता खरेदीची होणार नोंदणी
निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये सोयाबीन आणि कापसाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. कापूस पीक अंतिम टप्यात असतानाच ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन कमी झाले. यामुळे दर वाढीला हेच मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.
सध्या मिळणाऱ्या वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकरी पुढील पिकासाठी आर्थिक बजेट कमवू शकणार आहेत. कोरोना आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यामुळे आता काही शेतकऱ्यांना कापसामुळे चांगले दिवस आले आहेत. यामुळे शेतकरी सध्या सुखावला आहे.
source:- कृषी जागरण