Cotton Rate : पुढील हंगामात कापसाचे दर नरमतील?
पुणेः कापूस आणि सुताचे दर यंदा विक्रमी पातळीवर पोचले. मात्र सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची स्थिती आहे. या स्थितीत उद्योकांकडून कापसाला कमी मागणी राहिल. तसेच उत्पादनात वाढीची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे दरही नरमतील, असा अंदाज उद्योग आणि बाजरातील जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
चालू हंगामात कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडी वाढवल्या. तर चीनसारख्या देशातील सरकारने शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे पुढील काही महिन्यांत कापसाचे दर नरमण्याची शक्यता आहे. यंदा कापसाचे दर तेजीत आहेत. त्यामुळे सध्या गुतगिरण्यांमकडून मागणी घटली. सुताला मागणी नसल्याने दरात किलोमागे ३० ते ४० रुपयाने दर नरमले. परंतु सुताचा साठा मर्यादीत आहे. यामुळे सुताच्या दरातील नरमाई थांबेल, असाही दावा केला जात आहे. तर दुसरीकडे जागतिक पातळीवर उद्योगांकडे कापसाचा साठा असल्याचा दावा केला जात आहे. तर सध्या मागणी कमी होत असून कापसाच्या दरात नलमाई दिसत असल्याचे उद्योगाने सांगितले.
चालू हंगामात कापूस दराने विक्रम गाठला. यापुर्वी २०११ मध्ये इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंजवर कापसाने २०३ सेंट प्रतिपाऊंडचा दर गाठला होता. तर चालू हंगामात ४ मे रोजी १५५ सेंटचा टप्पा गाठला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसचा दर प्रतिपाऊंड ११६ ते १२३ सेंट दरम्यान आहेत. फिच सोल्यूशनच्या मते पुढील काळात कापूस दर आणखी नरमतील.
भारत, अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि ब्राझील या देशांत लागवड वाढीची शक्यता आहे. कापसाची वाढलेली लागवड आणि पुरक हवामान यामुळे उत्पादन वाढेल. याचा परिणाम कापूस दरावर जाणवेल. यातील काही देशांतील कापूस ऑगस्ट महिन्यात बाजारात येईल. मात्र दुसरीकडे जागतिक पातळीवर जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटात आहे. त्यामुळे उद्योगांकडून मागणी होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत कापूस सध्याच्या दरपातळीवरून कमी होईल, असा दावा या संस्थेने व्यक्त केला.
इंटरनॅशनल काॅटन एक्सचेंजवर जुलैचे वायदे १४३.७३ सेंटने झाले. हा दर खंडीमध्ये ८७ हजार ८७० रुपये होतो. एक कापूस खंडी ३५६ किलोची असते. तर ऑक्टोबरचे वायदे १२३.१२ सेंटने झाले. डिसेंबरचे वायदे ११६.२१ सेंटने पार पडले. चीनच्या झेंगझॅव कमोडिटी एक्सचेंजवर जुलैचे वायदे १८ हजार ९९० युआन प्रतिटनाने झाले. तर सप्टेंबरचे वायदे १९ हजार ६५ युआनने पार पडले. तसेच देशात शंकर ६ वाणाचा भाव सध्या ९५ हजार प्रतिखंडीवर आहे. परंतु या भावात कापसाला विक्रेते आणि खरेदीदारही मिळत नाही, असे जाणकारांनी सांगितले.
हे पण वाचाच:- पंजाब डख यांनी केला जुलै महिण्याचा हवामान अंदाज जाहीर; वाचा सविस्तर
साधारणपणे चीनच्या कापसाचे भाव भारतीय कापूस दरापेक्षा जास्त असतात. परंतु सध्या चीनचा कापूस स्वस्त मिळत आहे. यामुळे पुढील काळात दर नरमण्याची शक्यता दिसते. पुढील तीन ते चार महिन्यांत कापसाचे दर नरमतील आणि कापूस बाजार सुरळीत चालेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. देशात काही प्रमाणात मागणी घटली आणि उत्पादन वाढले तरी दर गेल्या हंगामातील पातळीवर पोचतील. तसेच देशात आत्तापर्यंत ९.५ लाख गटन कापूस आयात झाला. याचाही परिणामी बाजारावर होऊ शकतो, असा विश्वास उद्योगाने व्यक्त केला.
source:- ऍग्रोवोन