Cotton Seeds : विक्रेत्यांचे धाबे दणाणले, हंगामापूर्वीच कापूस बियाणे विक्रीवर बंदी, शेतकऱ्यांना फायदा..!

Cotton Seeds : विक्रेत्यांचे धाबे दणाणले, हंगामापूर्वीच कापूस बियाणे विक्रीवर बंदी, शेतकऱ्यांना फायदा..!

 

राज्यात 1 जूनपर्यंत कापसाच्या बियाणे विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून बियाणे विक्रेत्यांची तसेच सिड्स कंपनीच्या तपासणीचे काम कृषी विभागाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कुंभी शिवारातील यशोदा सिड्स कंपनीच्या प्लॅन्टवर धडक देत कृषी विभागाच्या भरारी पथकाने विविध कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी यशोदाच्या कपाशी बियाणांची निर्मीती कशी झाली यासाठी आवश्यक असलेले स्टेटमेंट 1 व 2 तसेच प्रिन्सिपल सर्टिफिकेटच नसल्याचे समोर आले. त्यामुळे यशोदाच्या कपाशी बियाणाच्या विक्रीवर थेट बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईमुळे भविष्यात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान तर टळले आहे पण बियाणे खरेदी पूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी यासंगदर्भात माहितीही मिळाली आहे.

कपाशी बियाणे विक्रीवर बंदी

यशोदा कंपनीच्या बियाणे विक्रीला तर बंदी घालण्यात आलेली आहेच शिवाय हिंगणघाट येथील पाच कृषी केंद्रामध्ये कपाशी बियाण्यांबाबतचे प्रिन्सिपल सर्टिफिकेटच नसल्याने या कपाशीच्या बियाणांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी कृषी विभागाने घेतलेली भूमिका शेतकऱ्यांसाठी फायद्याची होणार आहे. मध्यंतरीच कापूस बियाणे विक्रीला 1 जूनपर्यंत बंदी असताना बियाणे विक्री करणाऱ्या वर्धा शहरातील दोन कृषी केंद्रांचा बियाणे विक्रीचा परवानाच निलंबित केला होता. तर आता हिंगणघाट तालुक्यात धडक कारवाई करण्यात आली आहे.

कृषी विभागाची कारवाई शेतकऱ्यांना फायदा

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वर्धा कृषी विभागाने आक्रमकपणा दाखवत धडक कारवाईला सुरवात केली आहे. गत आठवड्यातच परवानगी नसताना कपाशी बियाणे विक्री करणाऱ्या दोन कृषी सेवा केंद्राच परवाना रद्द केला होता तर आता कपाशी बियाणे विक्रीवरच बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे भविष्यातील नुकसान टळणार आहे. दरम्यान, पिकांची उगवणच झाली नाही, उगवण झाली पण फलधारणाच नाही अशा तक्रारी कृषी विभागाकडे दाखल होतात. पण यंदा कृषी व विभागाने कारवाईचा बडगा दाखविल्याने अशा घटनांना आळा बसेल. जिल्हा कृषी अधीक्षक अनिल इंगळे यांच्या आदेशाने ही कारवाई केली जात आहे.

हे पण वाचा : पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ताही होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

कृषी विभागाकडून ‘सेल स्टॉप’ची पाटी

बियाणे विक्रीबाबत आवश्यक ती कागदपत्रे नसल्यामुळे कृषी विभागाकडून यशोदा बियाणे विक्रीवरच बंदी घातली आहे. एवढेच नाहीतर कृषी विभागाकडून ‘सेल स्टॉप’ लावण्यात आहे आहे. सध्या यशोदा कंपनीत कपाशी बियाणे कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्धा शहरातील काही कृषी केंद्रांची तपासणी करून दोन कृषी केंद्रांचा बियाणे विक्रीचा परवानाच निलंबित केला होता.

source : tv9marathi