शेतात रानडूकरांचा त्रास मग असे करा पीक संरक्षण..!

शेतात रानडूकरांचा त्रास मग असे करा पीक संरक्षण..!

 
लागवड केलेल्या पीकातून उत्पादनापेक्षा त्यापुर्वी पीकाचे संरक्षण कसे केले जाणार हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. कारण वन्य प्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस हा वाढत आहे. त्यामुळे नियोजित  पीकाचे उत्पादन घ्यावे की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे पिकांचे व पाळीव प्राण्यांचे वन्य जिवांपासून रक्षण करण्यासाठी विविध देशी तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला जात आहे. स्थानिक पातळीवर विकसीत केलेल्या पध्दतीही आज उपयोगी पडत आहेत. पारंपरिक पद्धतीने आपण वन्य प्राण्यांपासून पिकांचे व शेतीचे संरक्षण निश्‍चितच करू शकतो. या पध्दतीचा अवलंब शेतकऱ्यांना सहज शक्य आहे का? याचा अवलंब करीत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती आज आपण घेणार आहोत..

1) रंगीत साड्या पिकांभोवती बांधणे

ही पध्दत अत्यंत सोपी असून सर्वसामान्य शेतकऱ्यासही शक्य होणारी आहे. शिवाय ही शक्कल एका शेतकऱ्याचीच असून आता भुईमूंग, मका या पीकाभोवती रंगबेरंगी साड्या बांधल्या जात असल्याचे आपल्या निदर्शलास येते. यामध्ये रानडुकरांच्या वर्तवणूक पार्श्‍वभूमीचा वापर केला गेला आहे. या पद्धतीत विविध रंगांच्या साड्या पिकांच्या भोवती रोवल्या जातात. त्यामुळे रानडुकरांना शेतात कुणीतरी मानव असल्याचा भास होतो. त्यामुळे ते शेतात प्रवेश करण्यास भीतात. या पद्धतीचा जिथे मानवाची रेलचेल किंवा येणे-जाणे जास्त आहे, अशा भागात जास्त वापर होतो. यामुळे रानडुकरांमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण 40 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी करता येते.

2) असाही करता येतो रानडूकरांचा बंदोबस्त

रानडुकरांची दृष्टी आणि श्रवण हे दोन्हीही ज्ञानेंद्रीय ही कमकुवत असतात. याच ज्ञानेंद्रीयाच्या मदतीनेच ते आपले निवारा व अन्नाचा शोध घेत असतो. स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो. ही पद्धत अत्यंत कमी खर्चाची आहे. शेतात हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरविल्याने अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्‍वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. मारठवाड्यात अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत. ही पध्दत जरा निराळी असली तरी तेवढीच फायदेशीर आहे. शिवाय याकरिता खर्चही कमी आहे.
हे पण वाचा:- Digital Satbara : डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा कसा काढायचा? पहा पूर्ण प्रक्रिया!

3) गौऱ्याचा धूर करणे

स्थानिक डुकरांच्या विष्ठेपासून तयार केलेल्या गौऱ्या मातीच्या भांड्यात जाळून व त्याचा धूर करून सुद्धा आपण रानडुकरांना पळवू शकतो. या पद्धतीत धूर हळूहळू पसरून रानडुकरांना पळविले जाते. या पद्धतीचा वापर मुख्यतः सायंकाळी केला जातो. या पद्धतीत धुराचा वास येताच शेतात प्रवेश केलेल्या रानडुकरांना अगोदरच उपस्थित असलेल्या डुकरांचा आंदाज येतो. त्यामुळे एकत्र न येता रानडूकर हे पळ काढतात. म्हणजेच आपल्या आगोदरच या शेतामध्ये कोणीतरी आहे हे भासवून देण्याची ही पध्दत असून पीक संरक्षणासाठी महत्वाची आहे.

५) आवाजातून रानडूकरांना भीती

रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकरी बांधव विविध पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतात. जसे की, फटाक्यांचा वापर, स्थानिक ड्रम, रिकामे कॅन पत्राचे भांडे, जाळ करणे आणि जोरजोरात ओरडणे या पद्धतींचा वापर करतात. आता वेगवेळ्या आवाजाचे किंवा गाण्यांचे यंत्रही बाजारात उपलब्ध झालेले आहेत. त्याचा वापर करूनही रानडूकरांना विचलीत केले जाते. शिवाय हे रात्री सुरु करुन ठेवले की पहाटेपर्यंत सुरुच राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे कष्ट करावे लागणार नाहीत.

६) श्‍वानांचा वापर

काही वेळेस शेतकरी पिकांचे वन्य प्राणी आणि रानडुकरांपासून रक्षण करण्यासाठी पारंपरिक स्थानिक कुत्रे पाळतात. ज्यांच्या मदतीने या रानडुकरांना पळविले जाते व पिकांचे नुकसान टाळले जाते.
source:- tv9 marathi

Leave a Comment