वाळवंट ग्रीनिंग चॅम्पियन : सारकोकोर्निया

वाळवंट ग्रीनिंग चॅम्पियन : सारकोकोर्निया

 

गेल्या पाच वर्षांपासून सीवॉटर सोल्युशन्समधील आमचा कार्यसंघ हवामान, जमीन, पाणी आणि अन्न या सर्वोत्कृष्ट वनस्पतींच्या प्रजाती शोधत आहे. पर्यावरणाचा शोध घेताघेता हा प्रवास आम्हाला प्रत्येक खंडात घेऊन गेला, थेट बांगलादेश पासून ते स्कॉटिश हाईलँड्सपर्यंत.

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, पेरेनिअल सारकोकोर्नियाला अंतिम विजेता घोषित करताना आम्हाला  खूप आनंद होत आहे.

ही वनस्पती अत्यंत उच्च क्षार असलेल्या (समुद्राच्या पाण्यापेक्षा जास्त) पाण्यामध्ये वाढू शकते तसेच दुष्काळ सहनशील आणि पूर प्रतिरोधक सुद्धा आहे. उष्णकटिबंधीय वर्षावनांपेक्षा 30 पट जास्त कार्बन संचयित करते आणि 5 पट जलद आहे. ही असाधारण वनस्पती हे सर्व करते आणि बायोमासचा एक मोठा स्त्रोत आहे.

वार्षिक ४० टन प्रति हेक्टर उत्पादन देणारे (या तुलनेत गहू फक्त ६ टन उत्पादन देते), हे पीक अत्यंत पौष्टिक आहे. यात ओमेगा 3, बहुतेक धान्यांपेक्षा जास्त प्रथिने असतात आणि कोणत्याही स्थलीय वनस्पतीच्या लिनोलिक तेलांचे (linoleic oils) प्रमाण जास्त असते.

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये हे पीक निवडत आहोत आणि वाढवत आहोत. घाना या देशामधील आमच्या मुख्य कार्यक्रम अधिकारी जोएला कॉर्झॅकचा (Joella Korczak) हा फोटो कि, हे पीक किती लवकर वाढू शकते (6 महिन्यांपेक्षा कमी) आणि खराब झालेल्या मातीला गोड्या पाण्याशिवाय निरोगी मातीत बदलू शकते हे दर्शविते.

सर्वांत उत्तम म्हणजे, त्याच्या बारमाही स्वभावामुळे, हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या हंगामात कापणीची तत्काळ गरज नाही, ते वेगाने वाढू शकते. त्यामुळे शेतकरी हवामान-प्रभावित शेतीमध्ये लवचिकता देऊन, कापणी केव्हा करायची हे निवडू शकतात.

2021 पासून, आम्ही उत्कृष्ट परिणामांसह कालाहारी वाळवंट, बांगलादेश, स्पेन आणि पश्चिम आफ्रिकेतील टेराफॉर्म प्रकल्पामध्ये या पिकाचा वापर करत आहोत.

दिवसेंदिवस सुपीक जमीनी नापीक होत असल्याने, अन्न असुरक्षितता, दुष्काळ आणि गोड्या पाण्याची टंचाई यांसारख्या हवामान आव्हानांवर सर्वांगीण उपाय म्हणून क्षारयुक्त आणि निकृष्ट जमिनीचे उत्पादनक्षम जमिनींमध्ये रुपांतर करणे हाच एक उत्तम मार्ग आहे.

या शेतीचा वापर पशुधन आणि मत्स्यपालन फीडपासून ते टिकाऊ सोया आणि फिशमील स्त्रोतांऐवजी, तेल आणि अगदी बांधकाम साहित्यासाठी देखील केला जाईल.

तुम्हाला या अविश्वसनीय प्रजाती आणि त्यांच्या संभाव्यतेबद्दल अधिक जाणून घेण्यात स्वारस्य असल्यास, मोकळ्या मनाने आम्हाला संपर्क करा.

source : Yanik Nyberg