कांदा पिकावरील रोगांचे नियंत्रण कसे कराल

कांदा पिकावरील रोगांचे नियंत्रण कसे कराल

 
जांभळा करपा
हा रोग पिकांच्या कोणत्याही अवस्थेत येतो. या रोगामुळे पिकाचे ५० ते ७० टक्के नुकसान होते. पानावर सुरुवातीस खोलगट लांबट पांढुरके चट्टे पडतात. चट्टयाचा मधला भाग सुरुवातीस जांभळट व नंतर काळपट होतो. असे अनेक चट्टे पाने किंवा फुलांच्या दांड्यावर पडतात. रब्बी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाल्यास किंवा ढगाळ वातावरण असेल तर या रोगाची तीव्रता अधिक होते. रांगड्या हंगामातील कांद्यावरदेखील या रोगाचा बराच प्रादुर्भाव होतो.
उपाय

 • मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून रोपाच्या स्थानांतरानंतर ३o, ४५ व ६० दिवसांनी फवारणी करावी.
 • थायरम बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
 • फवारणीसोबत चिकट द्रवाचा वापर करावा.
 • नत्रयुक्त खताचा जास्त आणि उशिरा वापर करू नये. पिकांचा फेरपालट करावा. कांदा पिकावरील रोगांचे नियंत्रण

 

कमी खर्चात,घ्या ‘झेंडू’ चे पिक : वाचा संपूर्ण माहिती

 
मर रोग किंवा रोप कोलमडणेबी पेरल्यानंतर बुरशीचे तंतुमय धागे कूज किंवा रोपाच्या जमिनीलगतच्या भागात लागण करून रोपे कमजोर करतात; त्यामुळे काही वेळा ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. या रोगामध्ये रोपे पिवळी पडतात, जमिनीलगतच्या रोपांचा भाग मऊ पडतो आणि रोपे कोलमडतात व नंतर सुकतात. कोलमडलेल्या रोपांच्या जमिनी लगतच्या भागांवर पांढरी बुरशी वाढते पुढच्या वर्षी कांद्याची रोपवाटिका त्याच भागात केली तर मर रोगाचा आणखी जोरात प्रादुर्भाव होतो.
 
उपाय

 • पेरणीपूर्वी बियांना काबाँक्सीन हे औषध २-३ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे.
 • रोपे नेहमी गादी वाफ्यावर तयार करावीत, कारण गादी वाफ्यावर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.
 • रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.
 • एवढे करून रोगाचा प्रादुर्भाव दिसलाच, तर दोन रोपांच्या ओळीत कॅप्टन ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी मिसळून ओतावे.
 • रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
 • शेतात साचणारे पाणी टाळावे.

 
काळा करपा
महाराष्ट्रात खरीप हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. सुरुवातीला पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्याजवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार ठिपके वाढू लागतात. ठिपक्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाने काळी पडून वाळतात नंतर रोपे मरतात.
 
उपाय

 • मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • कांद्याची लागण करताना गादी वाफ्यावर करावी.
 • पाण्याचा योग्य निचरा ठेवावा.

 
तपकिरी करपा
या रोगाचा प्रादुर्भाव कदापिकावर तसेच बियाण्याच्या पिकावर बाहेरील भागावर दिसू लागतात. चठ्ठयाचा आकार वाढत जाऊन पाने सुकू लागतात. १५ ते २० अंश से. तापमान व ८० ते ९० टक्के आर्द्रता असल्यास बुरशीची वाढ झपाट्याने होते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाऊस
 
उपाय

 • पिकाचा फेरपालट, बीजप्रक्रिया, रोपे लावताना मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रावणाचा वापर केल्यास रोगाची तीव्रता कमी करता येते.
 • दर १५ दिवसांच्या अंतराने २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा हेक्झेंकोनॅझोल १0 मिलि किंवा प्रोपिकोनेंझोल १0 मिलि प्रति १0 लिटर पाणी घेऊन रोपाचे स्थानांतर केल्यानंतर ३o दिवसांनी ३ ते ४ फवारण्या कराव्यात. कांदा पिकावरील रोगांचे नियंत्रण 

www.santsahitya.in
संदर्भ:- mr.vikaspedia.in

Leave a Comment