Drip Irrigation Grant : महत्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 कोटी जमा; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची केली निवड!

Drip Irrigation Grant : महत्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 कोटी जमा; तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांची केली निवड!

 

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ घेता येतो. अशीच एक शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणारी माहिती समोर येत आहे. ती म्हणजे जिल्ह्यात महाडीबीटी पोर्टलद्वारे ठिंबक सिंचन व तुषार सिंचनासाठी तब्बल 44 हजार 208 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामधून 11 हजार 722 शेतकर्यांूची निवड करण्यात आलेली आहे.

सर्वात आनंदाची बातमी म्हणजे शेतकर्यांच्या बँक खात्यावर तब्बल 26 कोटी 1 लाख 41 हजार रुपये अनुदानाचे वाटप जमा करण्यात आले आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली. गतवर्षातील अनुदानाची रक्कम प्रत्यक्षात चालू आर्थिक वर्षात प्राप्त झाली आहे. नुकतेच त्याचे शेतकर्यांरना वाटप करण्यात आलेले आहे.

माहितीनुसार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील 18 कोटी 40 लाख 52 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त आहे. यामधून 6 हजार 450 शेतकर्यां ना 18 कोटी 40 लाख 52 हजार रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत 9 कोटी 10 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे.

हे पण वाचा:- Farmers grant : राज्य सरकारची मोठी घोषणा ,शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान

त्यातून 5 हजार 61 शेतकऱ्यांना 7 कोटी 29 लाख 17 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले, तर अटल भूजल योजनेत 89 लाख 28 हजार रुपये अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यातून 211 शेतकर्यांलना 31 लाख 72 हजार रुपयांचे अनुदान वाटप झालेले आहे.

जिल्ह्यास तीनही सिंचन योजनेत मिळून 28 कोटी 39 लाख 80 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यातून 26 कोटी 1 लाख 41 हजार रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण झालेले आहे. तर 2 कोटी 38 लाख 39 हजार रुपयांचे अनुदानाचे वितरण सुरू आहे.

source:- कृषी जागरण