शेतकऱ्यांना ठिबक सिंचनावर सरसकट मिळणार आता 80 टक्क्यापर्यंत अनुदान,कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती

शेतकऱ्यांना ठिबक सिंचनावर सरसकट मिळणार आता 80 टक्क्यापर्यंत अनुदान,कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती

 
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केंद्र व राज्य सरकारांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना (State and Center scheme) राबविल्या जात आहेत.अनुदानाच्या (Grants) माध्यमातून शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक मदत करण्यात येते. याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत अनुदान देण्यात येते.
अगोदर अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55% आणि इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान देण्यात येत होते. या अगोदर देण्यात येणारे अनुदान मध्ये वाढ करत शासनाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 55 टक्के अनुदान व्यतिरिक्त 25 टक्के पूरक अनुदान व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान व्यतिरिक्त तीस टक्के पूरक अनुदान कमाल पाच हेक्‍टर क्षेत्र मर्यादेत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.. याबाबतची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
या योजनेमध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ 246 तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रामुख्याने जे तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात व शेतकरी आत्महत्या ग्रस्त व नक्षलग्रस्त आहेत अशा तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. उर्वरित 106 तालुक्यात जा सुद्धा या योजनेमध्ये समावेश करण्यात येणार असून राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  हे पण वाचा:- शेतकऱ्यांच्या कर्ज माफी बद्दल पवारांचा सरकारला सल्ला
वर्ष 2021 22 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर जवळजवळ 589 कोटी रकमेसशासनाचे प्रशासकीय मान्यता आहे.हे सूक्ष्म सिंचनाची योजनामागेल त्याला ठिबकतत्त्वावर राबविण्यात येणार आहे.अर्ज केलेल्या सर्व पात्र शेतकर्‍यांनाअनुदानाचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. लाभार्थ्यांची पारदर्शकपणे निवड करण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनीऑनलाइन अर्ज करावा,असे आवाहन कृषिमंत्री भुसे यांनी केले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

  • सर्वप्रथम इच्छूकाला महाडीबीटी ऑनलाइन पोर्टल ओपन करायचे आहे. यामध्ये मुखपृष्ठावर अर्ज करा असा टॅग दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर सिंचन साधने सुविधा यावर क्लिक करुन समोरील बाबी निवडा हा पर्याय ओपन करायचा आहे. यामध्ये जिल्हा तालुका गाव आणि वैयक्तिक माहिती भरायची आहे. ही माहिती भरून झाल्यानंतर मुख्य घटक मध्ये सिंचन साधने आणि सुविधा हा घटक निवडायचा आहे.
  • यानंतर दिलेली माहिती पूर्ण भरायचे आहे. ज्या पिकासाठी आपल्याला ठिबक सिंचन पाहिजे आहे त्याची माहिती देते भरावी लागणार आहे. यानंतर पूर्वसंमती शिवाय मी योजनेचा लाभ घेणार नाही अशी नोंद करावी लागणार आहे. यानंतर भरलेली माहिती सेव्ह करायचे आहे. यानंतर मुख्य मेनू वर जाऊन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. मेनू वर आल्यानंतर सर्वात प्रथम ‘अर्ज सादर करा’ यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तालुका हे ऑप्शन दिसेल शिवाय तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव देखील येते समोर येईल.
  • यानंतर प्राथमिक प्रधान्य क्रमांक देऊन अटी-शर्ती त्या मान्य असल्याचे नमूद करावे लागणार आहे. यानंतर आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे. पूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 रुपये 60 पैसे आपल्या अकाउंट मधून भरावे लागणार आहेत याची प्रक्रिया ही ऑनलाइन करता येणार आहे.

मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची मोफत माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा
https://www.krushikranti.com/whatsapp-groups/
source:- कृषी जागरण

Leave a Comment