E-pik pahani : ई-पीक पाहणीतूनच आता खरेदीची होणार नोंदणी

E-pik pahani : ई-पीक पाहणीतूनच आता खरेदीची होणार नोंदणी

 
’ई-पीक पाहणी’ प्रणाली सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांनाच पीकपेऱ्याची नोंदणी करावी लागत आहे. गत खरिपापासून ही प्रणाली राबववी जात आहे. खरीप हंगामात राज्यभरातील जवळपास 84 लाख शेतकऱ्यांनी या माध्यमातून पिकांची नोंदणी केली होती. आता ‘ई-पीक पाहणी’करतानाच शेतकऱ्यांना उभ्या पिकाची छायाचित्र तसेच या पिकाची खरेदी केंद्रावरच विक्री करायची या संबंधी सुविधा दिली जाणार आहे. त्यामुळे  पिकांची नोंद आणि खरेदीची नोंदही होणार आहे. सध्या रब्बी हंगामात ‘ई-पीक पाहणी’ या उपक्रमाला अत्यंल्प प्रतिसाद मिळालेला आहे. शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा शिवाय खरेदी केंद्रावर शेतीमालाची विक्री करायची असल्यास त्याची सोयही आता ‘ई-पीक पाहणी’ या मोबाईल अँप  मध्येच असणार आहे. अशाप्रकारे नोंदणी सुरु झाल्यास शेतकऱ्यांच्या दोन अडचणी ह्या दूर होणार आहेत.

अँप मध्ये होणार हे बदल

सध्या ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून केवळ पिकांची नोंदणी केली जात आहे. यानंतर जर पिकाचे नुकसान झाले तर मात्र, पुन्हा पंचनामा करावाच लागतो आणि आर्थिक मदतीसाठी पुर्वसुचना ह्या संबंधित विभागाकडे द्याव्याच लागतात. पुर्वसुचना किंवा पंचनाम्याची सुविधा ही या अँप मध्ये नाही. पण आता नुकसान होताच पिकाचा फोटो अपलोड करण्याची सुविधा ही याच अँप मध्ये दिली जाणार आहे.
हे पण वाचा:- पीएम किसान योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांनी बँक खाते केले रिकामे; आता ‘या’ पद्धतीने होणार वसुली

खरेदीच्या नोंदणीचीही सुविधा

शेतकऱ्यांना जर शेतीमाल हा खरेदी केंद्रावर विक्री करायचा असेल तर महसूल विभागाकडून ‘ई-पीक पाहणी’ अँप वर भरलेल्या माहितीचाच आधार घ्यावा लागतो. मात्र, या अँप नोंदणीची सुविधा नाही. त्यामुळे आता समजा हरभरा पीकाची ‘ई-पीक पाहणी’ करुन झाली की लागलीच शेजारी असलेल्या नोंदणी बदणाला क्लिक करुन खरेदीसाठीची नोंदणीही शक्य होणार आहे. त्यामुळे पुन्हा त्यासाठी खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. सध्या या प्रणालीबाबत चाचण्या घेतल्या जात आहेत.

‘ई-पीक पाहणी’साठी 31 मार्च हीच ‘डेडलाईन’

‘ई-पीक पाहणी’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची नोंद करावी म्हणून आतापर्यंत 3 वेळा वाढीव मुदत दिली आहे. असे असतानाही शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदी पूर्वीच्या पध्दतीनेच होणार आहेत. आता हंगामाच अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे 31 मार्च हीच पीक नोंदणीसाठीची अंतिम मुदत असल्याचे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनाच ‘ई-पीक पाहणी’ची प्रक्रिया पूर्ण करायची असली तरी याची जबाबदारी ही संबंधित तलाठ्यावर सोपवण्यात आली आहे.
source:- tv9 marathi

Leave a Comment