खुशखबर : ई-पिक पाहणी पिक नोंदणीसाठी मुदत वाढली!

खुशखबर : ई-पिक पाहणी पिक नोंदणीसाठी मुदत वाढली!

 
एकीकडे पावसाचे थैमान असताना ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांना पडलेला होता. मात्र, शेतकऱ्यांनी आता घाबरण्याचे कारण नाही कारण या माध्यमातून खरीप पिकांच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परस्थितीमुळे शेतकऱ्यांना आता 15 ऑक्टोंबर पर्यंत पिकाच्या नोंदी करता येणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात परीपत्रक काढले आहे.
‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद ही स्व:ता करायची आहे. ‘ई-पीक पाहणी’ द्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे. शिवाय यंत्रणेत कोणी मध्यस्थी नसल्याने थेट लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे. ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंदणी या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. हा ऐतिहासक निर्णय असून शेतकऱ्यांची गैरसाय ही टळणार आहे.
अशी करा ई पीक पाहणी आपल्या मोबाईल वर पहा खालील व्हिडीओ मध्ये 

यामध्ये अनियमितता होणार नाही. प्रशासनाशी थेट जोडणी असल्याने पीक पेऱ्याची आकडेवारी, भविष्यातील उत्पादन आणि बाजारभाव याबद्दल शेतकऱ्यांना माहिती होणार आहे. मात्र, राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाची नोंदणी करण्यास अडसर निर्माण झाला होता. राज्यातील परस्थिती लक्षात घेता ‘ई-पिक पाहणीला 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
हे पण वाचा:- ई-पीक-पाहणी म्हणजे काय? पहा त्याचे फायदे अन् तोटे

अशी वाढली आतार्यंत मुदत

‘ई-पिक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद करण्याची हे पहिलेच वर्ष आहे. सुरवातीला 15 सप्टेंबर पर्यंतच मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा याअनुशंगाने 30 सप्टेंदरपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. आता तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्यामार्फत ही नोंदणी करण्यास सुरवात होती. पण राज्यात अतिवृष्टी झाल्याने पिकाची नोंद करणे शक्य झाले नाही त्यामुळे आता 15 ऑक्टोंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.

ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अँप मुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.
2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.
3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.
5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

‘ई-पीक पाहणी’ अँप मधील त्रुटी

1) ‘ई-पीक पाहणी’बाबत शेतकऱ्यांना आतापर्यंत योग्य जनजागृती आणि मार्गदर्शन झालेले नाही.
2) अत्याधुनिक प्रकारचे मोबाईल वापराची माहिती शेतकऱ्यांना नाही. अॅपमध्ये नेमकी माहिती भरायची कशी हेच शेतकऱ्यांना माहिती नसल्याने शेतकरी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करी आहेत.
3) यंदा अशाप्रकारे माहिती भरुन घेतली जात आहे. मात्र, दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागणार हे स्पष्ट नाही.
source:- tv9 marathi

Leave a Comment