fal pik vima yojana : फळपिक विमा योजनेचा असा घ्या लाभ, फळबागायत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

fal pik vima yojana : फळपिक विमा योजनेचा असा घ्या लाभ, फळबागायत शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

 
हवामान बदलातील परिणाम हे यंदा फळपिकावरही मोठ्या प्रमाणात दिसून आले आहेत. (Fruit Crop Insurance) त्यामुळे फळपिकांचाही विमा उतरविण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. ( Insurance Registration Begins) यातच राज्यात आंबिया बहरासाठी फळपिक विमा योजनेतील नोंदणी अर्जाला सुरवात झाली आहे. अवेळी पाऊस तापमानातीव बदल, अतिवृष्टी किंवा गारपीटीमुळे नुकसान झाल्यासही अनुदान हे मिळणार आहे. या 9 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्रॉबेरी ही पिके असतील.
सध्याच्या कालावधीत घेतले जाणारे हे फळपिक आहे. यंदा वातावरणातील बदल आणि अधिकचा झालेला पाऊस यामुळे अनेक फळबागायत हे विमा योजनेचा लाभ घेतील असे चित्र आहे. अधिसूचित क्षेत्र व अधिसूचित फळांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी. एक शेतकरी एकापेक्षा जास्त फळबागांसाठीदेखील या योजनेत भाग घेऊ शकतात. मात्र त्या फळासाठी संबंधित मंडळ अधिसूचित आहे की नाही याची खात्री शेतकऱ्यांना करावी लागेल. एक शेतकरी चार हेक्टरच्या मर्यादेपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकतो. विमा संरक्षित रकमेच्या पाच टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ठेवण्यात आलेला असतो.

आंबिया बहर म्हणजे नेमके काय?

आंबिया बहर हे नोव्हेंदर-डिसेंबर किंवा डिसेंबर जानेवारी मध्ये घेतले जाणारे फळपिकं आहेत. ज्यावेळी आंब्याला बहर येतो त्या दरम्यान हे फळपिक बहरात असते. यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्ट्राबेरी यांचा समावेश होत आहे.
हे पण वाचा:- आता शेतरस्त्यांचा प्रश्न मिटणार, शेत-पाणंद रस्ते उभारणीसाठी राज्य सरकारची योजना!

ही आहेत आवश्यक कागदपत्रे

कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी देखील ही योजना ऐच्छिक असेल. बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास आधार ओळखपत्र, सातबारा, आठ अ उतारा, पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र, फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र, ब‌ँकेचे खातेपुस्तक अशी माहिती गोळा करावी. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा गावातील सीएससी सेंटरवर उपलब्ध आहे.

या संकेतस्थळावर घेता येणार सहभाग

शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या साईट्स चा उपयोग होणार आहे. केंद्र सरकारने hhhps://pmfby.gov.in या साईट्स चा वापर करण्याचे अवाहन केले आहे तर राज्य सरकारने http://www.maharashtra.gov.in या साईटवर पिक विमा कंपन्या जिल्हे, विमा प्रतिनीधी यांची नावे दिलेली आहेत.
source:- tv9 marathi

Leave a Comment