Farmers grant : राज्य सरकारची मोठी घोषणा ,शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान

Farmers grant : राज्य सरकारची मोठी घोषणा,शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे अनुदान

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज कॅबिनेटमीटिंगमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना कोणतीही अट न घालता 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबीटकर यांनी केलेल्या मागणीवरून हा निर्णय घेत असल्याचेही सांगितले.

 हे पण वाचा:- Agricultural loans : शेतीचे कर्ज थकल्यास गावात दवंडी पिटणार वाचा सविस्तर काय आहे प्रकरण !

नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नव्हते. परंतु आता याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय पुढच्या कॅबीनेट मिटींगमध्ये काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हे पण वाचा:- Punjab dakh havaman andaj : पंजाब डख – राज्यात 15 जुलै पासून काही भागात सुर्यदर्शन

निवेदनातील जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

source:- कृषी जागरण