Fertilizer grant : केंद्र सरकारकडून खतांसाठी १.१० लाख कोटींचे अतिरिक्त अनुदान

Fertilizer grant : केंद्र सरकारकडून खतांसाठी १.१० लाख कोटींचे अतिरिक्त अनुदान

 

जागतिक स्तरावर खतांच्या झालेल्या दरवाढीपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाकडून १.१० लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान वितरिक केले जात आहे. त्यातील १.५ लाख कोटी रुपये २०२२-२३ च्या वार्षिक अर्धसंकल्पामध्ये अगोदरच मंजूर केलेले आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी (ता. २१) म्हणाल्या.

सीतारामन यांनी एकापाठोपाठ ट्वीट केले आहेत. त्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या करात केलेल्या कपातीबाबत माहिती दिली. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे दर आवाक्यात ठेवण्याची ग्वाही दिली. त्या म्हणाल्या की, जग हे एका कठीण काळातून जात आहे. त्याचबरोबर कोविड महामारीच्या संकटातून सावरत आहे. मात्र, युक्रेन युद्धामुळे जगभरात पुरवठा साखळीत अडचणी निर्माण झाल्या असून विविध वस्तूंची कमतरता जाणवत आहे. युक्रेनच्या युद्धामुळे जगभरात अनेक देशांमध्ये महागाई आणि आर्थिक संकट निर्माण झाले आहे, असेही, मंत्री सीतारामन म्हणाल्या.

हे पण वाचा:- Havaman Andaj : मान्सूनपूर्व पाऊस दाखल, कोकण, गोवा अन् विदर्भातून होणार श्रीगणेशा

आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय परिस्थिती असूनही जीवनावश्‍यक वस्तूंची कमतरता, टंचाई होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. अगदी विकसीत राष्ट्रांनाही काही बाबींच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, आम्ही जीवनावश्‍यक वस्तुंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे ही सीतारामन म्हणाल्या.

संदर्भ:- ऍग्रोवोन