शेवग्याच्या शेती मधून मिळवा उत्तम कमाईची संधी!

शेवग्याच्या शेती मधून मिळवा उत्तम कमाईची संधी!

 
krushi kranti : ग्रामीण भागामध्ये राहून जर एखादा व्यवसाय (Business) चालू करायचा असेल तर तुम्ही शेतीमध्ये थोडी सुधारणा करून शेती व्यवसाय (agribusiness) चालू करू शकता जसे की तुम्ही जर पारंपरिक पिके (Crop) घेत असाल त्याचबरोबर तुम्ही आज काल मार्केट मध्ये जी मागणी आहे.ती मागणी त्याप्रकारे शेती (Farming) मध्ये पिके घेऊन व्यवसाय करू शकता. जे की आरोग्यासाठी जी पिके (crops for health) आहेत ज्याची बाजारात ग्राहकांची मागणी आहे अशी पिके घ्या. या नगदी पिकांपासून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात.

सध्याच्या कलयुगामध्ये पाहायला गेले तर जी शेवग्याची शेंगेची जी शेती आहे ती केली तर तुम्ही खूप फायद्यात राहाल, जसे की आपल्याकडे आठवड्यातून १ ते २ वेळा तरी जेवणामध्ये शेवग्याची शेंग करतात. परंतु तुम्ही या व्यतिरिक पाहायला गेला तर शेवग्याची जी झाडे आहेत त्या झाडाच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण पाहायला भेटतात.तुम्हाला जर शेवग्याच्या झाडाची शेती करायची असेल तर त्यास पाहिजे असा जास्त खर्च लागत नाही तसेच यामधून तुम्ही भरपूर प्रमाणात पैसे कमवू शकता.
तुम्ही जर एक एकर मध्ये शेवग्याच्या झाडाची लागवड केली तर तुम्हास लाखो रुपयांचे उत्पादन मिळू शकते.शेवग्याच्या झाडात अनेक औषधी गुणअसल्यामुळे ग्राहकांची मागणी वाढली आहे आणि यास मोठ्या प्रमाणात महत्व दिले जात आहे. मागणी वाढल्यामुळे शेवग्याच्या झाडाची शेती  मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्यामुळे जगभरातील ग्राहक औषधी वनस्पती म्हणून शेवग्याच्या झाडाकडे पाहत आहेत.
शेवग्याला वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलिफेरा असे आहे. शेवग्याच्या झाडाला जास्त पाण्याची गरज नसते त्यामुळे तुम्ही शेवग्याच्या झाडांची लागवड करू शकता. शेवग्याचे जेवढे झाड उष्ण प्रमानात वाढते तेवढे हे झाड थंड वातावरणात वाढत नाही.शेवग्याच्या प्रत्येक झाडापासून कमीत कमी ३०-३५ शेंगा आपल्याला भेटतात ज्या की प्रत्येक वर्षी आपल्याला त्यापासून वाढीव उत्पादनच बघायला भेटते.
हे पण वाचा:- कर्टुले लागवड संपूर्ण माहिती
शेवग्याचे जे झाड असते त्याच्या पानांची तसेच त्याला फुले सुद्धा असतात त्याची आपण भाजी करत असतो कारण ते एक औषधी वनस्पती आहे त्यामुळेआपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. शहरातील जास्तीत जास्त ग्राहक बाजारामध्ये आरोग्यासाठी  जी चांगली भाजी  आहे जे की  त्यापासून आपल्याला शरीराला औषधी गुण भेटतात अशा भाज्यांची मोठ्या प्रमाणात मागणी करत आहेत.
त्यामुळे तुम्ही  जर  ग्रामीण भागात जास्त खर्च न करता तसेच जास्त भांडवल न गुंतवता जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही शेतीला जोडधंदा म्हणून शेवग्याच्या झाडाची शेती करू शकता. बाजार भावात जर तुम्ही शेवग्याच्या शेंगेच्या भाव मिळाला तर अगदी चांगल्या आणि देशी शेंगेला १५ रुपये पावशेर म्हणजे ६० रुपये किलो ने भाव भेटतो त्यामुळे तुम्ही जे शेतामध्ये याची झाडे लावून व्यवसाय केला तर चांगले पैसे भेटतील.
शेवग्यामध्ये अँटीबायोटिक अँटीफंगल, अँटीबैक्टीरियल (Antibiotic Antifungal, Antibacterial) मोठ्या प्रमाणात गुणधर्म असतात. शेवग्याच्या पानांचा उपयोग करून बनवण्यात येणारे ‘मोरिंग्या सिरप’ (‘Moringa syrup’) तीनशेपेक्षा अधिक रोगांवर उपचार म्हणून वापरण्यात येतो शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. शेवग्याचे साल, पाने, बियाणे, डिंक, रूट (Sugarcane bark, leaves, seeds, gum, root) इत्यादीपासून आयुर्वेद औषध (Ayurvedic medicine) तयार करता येते.
शेवग्याचे पीक कोरडवाहू जमिनीत (In dryland soils) येत असल्यामुळे अधिक फायदेशीर ठरते शेवगा पिकासाठी ठराविक प्रकारचीच जमीनच असावा अस काही नाही, हलक्या जमिनीत देखील शेवगा पिकाची लागवड करणे शक्य आहे, शेवग्याच्या पिकाला पाणी देखील खूप कमी प्रमाणात लागते शेवग्याची शेती कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळवून देणारी आहे.
source:- कृषी जागरण

Leave a Comment