आता घर बसल्या ५ मिनिटांत काढा शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा

आता घर बसल्या ५ मिनिटांत काढा शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा
 
सातबारा, ८-अ प्रमाणेच शासनाने आता शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा देण्यास सुरूवात केली आहे. आपल्या शेताच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील किंवा आपल्या शेतातून रस्ता काढायचा असेल तर तुमच्याकडे शेत जमिनीचा नकाशा असणे आवश्यक आहे. mahabhunakasha.mahabhumi.gov.in या संकेत स्थळावरून शेत जमिनीचा नकाशा आता तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवरून काढू शकता. यासाठी सरकारने ई- नकाशा प्रणाली आणली आहे.
 

 
ई – प्रणाली म्हणजे काय? –
भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे जतन केलेले आहेत. शेत जमिनीच्या हद्दी कायम करण्यासाठी या नकाशांचा उपयोग केला जातो. हे सर्व नकाशे १८८० पासून तयार केले आहेत. त्यामुळे हे नकाशे जिर्ण झाले आहेत. त्यामुळे या नकाशांचे डिजीटायजेशन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या प्रणालीलाच सरकारने ई- नकाशा असे नाव दिले आहे. या प्रणाली अंतर्गत सरकार तालुका स्तरावरील भूमी अभिलेख कार्यालयातील बिनशेती नकाशे, भूसंपादन नकाशे, फाळणी नकाशे यांचे डिजीटायजेशन करत आहे. त्यामुळे डिजीटल सातबारा, ८- अ उतारा यांच्यासोबतच शेतकऱ्यांना शेतजमिनीचा डिजीटल नकाशाही मिळणार आहे.
 

हे पण वाचा:- पाच दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज

 
ई- नकाशा कसा काढायचा –
तुम्हाला जर शेतजमिनाचा नकाशा काढयाचा असेल तर तुम्हाला गुगलवर भू- नक्शा (bhunaksha) असे सर्च करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर भू-नक्शा नावाची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नविन पेज उघडेल. संगणकाच्या पडद्यावर तुम्हाला ही लिंक दिसेल. या पेजवर डाव्या बाजूला लोकेशन म्हणजे ज्या ठिकाणचा नकाशा काढायचा आहे, तो रखाना दिसेल. या रखान्यात ज्या राज्यातल्या शेतजमिनीचा नकाशा काढायचा आहे, त्याचे नाव टाकायचे आहे. यानंतर दुसऱ्या रखान्यात कॅटेगिरीमध्ये रुरल आणि अर्बन म्हणजेच शहरी आणि ग्रामीण असे पर्याय दिसतील. यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे. शेवटी व्हिलेज मॅप या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ही सगळी माहिती अचुक भरल्यानंतर शेजारी उजव्या बाजूला गावाचा नकाशा उघडला जाईल. तुमची शेतजमिन ज्या गावात आहे, त्या गावाचा नकाशा तुम्ही बघू शकता. हा नकाशा तुम्ही होम या बटणाशेजारील अधिक आणि वजाबाकीचे चिन्हावर क्लिककरून झूम इन किंवा झूम आऊट करून पाहू शकता.
 

हे पण वाचा:- विकेल ते पिकेल’ हे अभियान देईल शेतमालाला हमखास भाव- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 
आता जमिनीचा नकाशा कसा काढायचा हे पाहूया. याच पेजवर खालच्या बाजूला सर्च बाय प्लॉट नंबर अशा नावाचा रखाना आहे. याठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीच्या सातबाऱ्यावरचा गट क्रमांक टाकायचा आहे. यानंतर तुमच्या शेतजमिनाचा गट नकाशा ओपन होतो. आता स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या गावाच्या नकाशात तुमच्या शेतजमिनीचा नकाशा निळ्या रंगात रंगवलेला दिसेल. तसेच तुमच्या जमिनीच्या शेजारील इतर जमिनींचे गट नंबर दिसतील. यानंतर डावीकडील बाजुला प्लॉट इन्फो या रखान्यात ही जमिन कोणाच्या नावावर आहे त्याचे नाव, तसेच या शेतकऱ्याच्या नावावर किती शेत जमिन आहे, याची माहिती दिलेली असेल. तुम्ही दिलेल्या गट क्रमांत ज्या ज्या शेतकऱ्यांची जमिन आहे, त्याचीही माहिती तुम्हाला त्याठिकाणी दिसते. या माहितीच्या सर्वात शेवटी मॅप रिपोर्ट हा पर्याय दिसतो. यावर क्लिक केल्यावर जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्या समोर दिसतो. यानंतर उजवीकडील वरिल बाजूला खालच्या दिशेने असलेल्या बाणावर क्लिक करून तुम्ही जमिनीचा प्लॉट रिपोर्ट डाऊनलोड करू शकता. यावर तुमच्या जमिनीच्या शेजारी असलेल्या जमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात. तसेच खालच्या बाजूला या नकाशात ही जमिन कोणत्या शेतकऱ्याची आहे, त्याचे नाव आणि त्याच्या नावावर किती शेतजमिन आहे याची माहिती दिलेली असते.
संदर्भ:-  agrowonegram.com
https://www.santsahitya.in/

1 thought on “आता घर बसल्या ५ मिनिटांत काढा शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा”

Leave a Comment