Gopinath munde vima yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल, वाचा सविस्तर!

Gopinath munde vima yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल, वाचा सविस्तर!

 
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी ची फार महत्वाची योजना आहे. शेतकरी शेतात काम करत असताना जर विज पडणे, सर्पदंश, पूर, विंचू दंश, विजेचा शॉक लागणे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच रस्त्यावरील अपघात, वाहन आपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे तर शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवला किंवा काहींना अपंगत्व येते
घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन आर्थिक अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा शेतकऱ्यांना व शेतकरी कुटुंबांना लाभदायक ठरते.
अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक लाभ देण्याकरता कुठल्याही प्रकारची स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे ही योजना फायद्याची ठरते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.

या योजनेत अंशतः झालेला बदल

अपघातग्रस्त, मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाते. अगोदरचे नियमाप्रमाणे सहा महिन्यांपूर्वी ज्या शेतकऱ्याचा अपघात झाला आहे अशा शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन असणे आवश्यक होते. मात्र आता झालेल्या बदलानुसार शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर शेतजमीन असली तरी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ केव्हा मिळणार नाही?

नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधी पूर्वीची अपंगत्व,आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, आत्महत्येचा प्रयत्न, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, बाळंतपणातील मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्राव,सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा विमा संरक्षणात समावेश नाही.

या योजनेसाठी ची पात्रता

राजा मधील जेवढे सातबारा धारक शेतकरी आहेत त्यांचा विमा हप्ता शासनामार्फत करण्यात आला असून दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. या याचा लाभ 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्याला मिळणार आहे. यापूर्वी ज्या चा अपघात झाला आहे त्या शेतकऱ्यांचा सातबारा असणे आवश्यक होते. परंतु आता कुटुंबातील कोणताही सदस्यांच्या नावे शेतजमीन असली तरी सहभागी होता येणार आहे.

विमा दाखल करताना जोडावयाची कागदपत्रे

 1. सातबाराउतारा
 2. 6क
 3. 6 ड ( फेरफार उतारा)
 4. एफ आय आर
 5. पंचनामा
 6. पोस्टमार्टम रिपोर्ट
 7. व्हिसेरा रिपोर्ट
 8. दोषरोप
 9. दावा अर्ज
 10. वारसदाराचे राष्ट्रीयकृत बँक खाते पुस्तक
 11. घोषणापत्रअव घोषणापत्र ब
 12. वयाचा दाखला
 13. तालुका कृषी अधिकारी पत्र
 14. अकस्मात मृत्यूची खबर
 15. घटनास्थळाचा पंचनामा
 16. वाहन चालवण्याचा वैध परवाना
 17. अपंगत्वाचा दाखला फोटो
 18. औषधोपचाराचे कागदपत्र
 19. अपघाती नोंदणी 25 दिवसांच्या आत करणे आवश्यक

ही सगळी कागदपत्रे कृषी विभाग कडे जमा करावे लागतात. कृषी विभाग नियुक्त केलेल्या विमा कंपनीकडे या कागदपत्रांची पूर्तता करतात. त्यानंतर योग्य ती चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यास किंवा शेतकरी कुटुंबास विमा रक्कम अदा केली जाते.

या योजनेअंतर्गत अपघाता नुसार ठरविण्यात आलेली रक्कम

अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाले असतील तर दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.
अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येते.

संबंधित माहिती वाचा: 

source:- कृषी जागरण

Leave a Comment