औषधी वनस्पतींसाठी सरकारचा मेगा प्लॅन,शेतकऱ्यांना 5 हजार कोटी मिळणार!

औषधी वनस्पतींसाठी सरकारचा मेगा प्लॅन,शेतकऱ्यांना 5 हजार कोटी मिळणार!

 
कृषी क्रांती :- आपला देश जैवविविधतेच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे. भारतातील (Indian) झाडं, झाडे (Tree) आणि पिके (Crop) केवळ आपल्या अन्नाची गरज पूर्ण करत नाहीत तर औषधी गुणधर्मांनी देखील संपन्न आहेत. जे शेतकरी विशेषतः हर्बल शेतीशी जोडलेले असतील तर ते त्यातून चांगला नफा देखील मिळवू शकतात.
बाजारात खूप मागणी असल्यानं शेतकरी (Farmers) औषधी वनस्पतींच्या लागवडीतून चांगली आर्थिक कमाई करु शकतात (They can earn good money by cultivating medicinal plants.). भारतात झाडांच्या रोपांचे वेगवेगळे भाग वापरून रोग आणि आजारांवर उपचार करण्याची पद्धती बऱ्याच काळापासून सुरु आहे.

भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्या देशाला उच्च जैवविविधता असलेल्या देशाचा दर्जा दिला जातो. वनस्पतींच्या अनेक जाती फक्त भारतातच आढळतात. सरकारनं या जैवविविधतेचा फायदा शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी पावलं उचलली आहेत. केंद्र सरकार (Central Government) या संदर्भात पाच हजार कोटींचा मेगा प्लॅन (Five thousand crore mega plan) तयार करत असल्याची माहिती आहे.

8000 झाडे आणि रोपांचा औषधांसाठी वापर (8000 plants and seedlings used for medicine)

भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 8000 झाडे आणि रोपांचा वापर औषधा साठी केला जातो. त्यांच्यापासून बनवलेल्या उत्पादनांना आणि औषधांना परदेशात चांगली मागणी आहे. या मागणीमुळे शेतकऱ्यांसाठी हर्बल शेतीचा नवा पर्याय खुला झाला आहे. औषधी वनस्पतींची हर्बल शेती करुन शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.
हे पण वाचा:- शेवग्याच्या शेती मधून मिळवा उत्तम कमाईची संधी!

कोरोनामुळे जीवनशैली बदलली

कोरोनामुळे (Corona) अनेक लोक पुन्हा एकदा नैसर्गिक पेय आणि औषधांकडे वळले आहेत. शरीराची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यापासून ते उत्तम आरोग्यासाठी लोक औषधी वनस्पतींचा अवलंब करत आहेत. भारतीय औषधी वनस्पतींची वाढती मागणी लक्षात घेता, औषधी वनस्पतींची लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
औषधी वनस्पतींच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना सर्व शक्य सहकार्य करत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत औषधी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 4000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न 5000 कोटी रुपये असेल (The income of farmers will be Rs 5,000 crore)

राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने (By the National Medicinal Plants Board) सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी (For cultivation of medicinal plants) मदत केली आहे. येत्या काही वर्षांत 10 लाख हेक्टर क्षेत्र 4000 कोटी रुपये खर्च करून औषधी वनस्पतींच्या लागवडीखाली आणली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 5000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल.
औषधी वनस्पतींच्या प्रादेशिक बाजारपेठांचे जाळंही निर्माण करण्यात येणार आहे. औषधी वनस्पतींची शेती देखील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अश्वगंधा (Ashwagandha), गिलोय (Giloy) , भृंगराज (Bhrangraj), सातवार, पुदिना (Mint), मोगरा (Mogra), तुळशी (Tulsi), कोरफड (Aloe), ब्राह्मी (Brahmi), शंखपुष्पी (Conch) आणि गुलर (Gular) इत्यादी अनेक औषधी वनस्पती आहेत, ज्याची लागवड शेतकरी करू शकतात आणि आर्थिक कमाई करु शकतात.
हे पण वाचा:- भेंडी पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन
औषधी पिकांना जास्त देखभाल आणि पाण्याची गरज नसते. काही औषधी वनस्पती कमी वेळात तयार होतात आणि एकदा त्याची लागवड केली की शेतकऱ्यांना अनेक पटीने उत्पादन मिळतं. यामुळे शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करुन कमी खर्चात जादा उत्पन्न मिळवू शकतात.
source:- TV9 Marathi
————————————————————————————————————————–
कृषी क्रांती वर घर बसल्या आपल्या शेतमालाची खरेदी-विक्री करू शकता, त्यासाठी खालील लिंकचा वापर करा 
https://www.krushikranti.com/ 

Leave a Comment