रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु, शेतकऱ्यांच्या खात्यावर ७५ हजार ५१४ कोटी पाठवले- वाचा सविस्तर

रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु, शेतकऱ्यांच्या खात्यावर ७५ हजार ५१४ कोटी पाठवले- वाचा सविस्तर
 
नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून 2020-21 च्या खरिप आणि 2021-22 च्या रब्बी हंगामात किमान आधारभूत किमतीला गव्हाची खरेदी चालू आहे. याअंतर्गत 20 मे 2021 पर्यंत 75 हजार 514.61 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. तर, किमान आधारभूत किमतीला 382.35 लाख मेट्रिक टन गहू शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. तर, 39 लाख 55 हजार शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आलीय.
 

हे पण वाचा :- हवामान खात्याने केलेला अंदाज खरा ठरला, मान्सून झाला अंदमानात दाखल

 
धांन्याची खरेदी सुरु
धांन्य उत्पादक शेतकऱ्यांकडून 20 मेपर्यंत 760.06 लाख मेट्रीक टन धांन्याची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये खरिप हंगामातील 705.52 लाख मेट्रीक टन तर रब्बी हंगामातील 54.45 लाख मेट्रीक टन धांन्याची खरेदी करण्यात आलीय. किमान आधारभूत किमतीवर धांन्य खरेदी सुरु आहे. तर, गेल्यावर्षी 703.09 लाख मेट्रीक टन धांन्य खरेदी करण्यात आली होती. 113.30 लाख शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमंतीवर 1 लाख 43 हजार 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
 
डाळींची रेकॉर्ड ब्रेक खरेदी
सन 2020-21 च्या खरिप हंगामात उत्पादित झालेल्या डाळींची देखील विक्रमी खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे करण्यात आलीय. मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग,सोयाबीन इत्यादी डाळींची 6 लाख 76 हजार 103 मेट्रीक टन खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान मधील 4 लाख 04 हजार 2224 शेतकऱ्यांकडून 3 हजार 541.67 कोटींची खरेदी करण्यात आली आहे.
 
कापूस खरेदी देखील सुरु
किमान आधारभूत किमंत योजनेद्वारे पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगाना, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि कर्नाटक राज्यामध्ये कापूस खरेदी सुरु आहे. याशिवाय 14 मे पर्यंत केंद्र सरकारने कर्नाटक मधील शेतकऱ्यांकडून 5089 मेट्रीक टन नारळ खरेदी केले आहेत, यासाठी 52.40 कोटी रुपये देण्यात आले.
संदर्भ :- tv9 marathi.com
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment