जादा किंमतीने खत विक्री केल्यास ‘इथं’ करा तक्रार: कृषी आयुक्तालय

जादा किंमतीने खत विक्री केल्यास ‘इथं’ करा तक्रार: कृषी आयुक्तालय
 
पुणे:- खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान (एनबीएस) धोरणात केंद्र सरकारने बदल करून शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांसाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत. मात्र पूर्वीच्या जादा दरात खत विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवावी, असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
 
शेतकऱ्यांना कमी दरात खते मिळण्यासाठी केंद्र सरकारने खतनिर्मिती कंपन्यांना अनुदान वाढवून देणारी सूचना गुरुवारी (ता.२०) जारी केली. परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष करून काही भागांत खते विकत घेताना शेतकऱ्यांना जुन्या व नव्या दराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. त्यामुळे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दखल घेत कृषी आयुक्तालयाची बाजू स्पष्ट केली आहे.
हे पण वाचा:- ‘हवामान अंदाज’ हवामान खात्याने केलेला अंदाज खरा ठरला, मान्सून झाला अंदमानात दाखल

पंचायत समितीही दखल घेणार

कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांसाठी दोन संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. खतांसंबंधी तक्रारींचा तत्काळ निपटारा झाला पाहिजे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याकडे देखील तक्रार करता येईल.
‘‘केंद्र शासनाने सुधारित अन्नद्रव्य आधारित अनुदान जाहीर केले आहे. यात स्फुरद अन्नद्रव्याचे अनुदान वाढविण्यात आल्याने स्फुरदयुक्त खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दरात खताची खरेदी करावी. कोणत्याही ठिकाणी सुधारित अनुदान जाहीर होण्याच्या पूर्वीच्या किमतीत खत विक्री होत असल्यास आयुक्तालयाच्या कक्षाशी संपर्क साधावा,’’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 
 

‘इफ्को’कडून नव्या किमती जाहीर

 
दरम्यान, केंद्र शासनाने खतांसाठी अनुदान वाढवून देताच शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी इफ्कोने (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) तातडीने सुधारित किमती जाहीर केल्या. इफ्कोचे राज्य विपणन व्यवस्थापक यू. आर. तिजारे यांनी ‘डीएपी’ची किंमत १२०० रुपये (५० किलो गोणी) राहील, असे स्पष्ट केले. याशिवाय इफ्कोकडून २०:२०:०:१३ खताची किंमत ९७५ रुपये, १०:१०:२६ ची गोणी ११७५ रुपये, तर १२:३२:१६ ची गोणी ११८५ रुपयांनी विकली जात आहे. ‘‘इफ्कोच्या बॅगेवर जास्त एमआरपी छापलेली असली, तरी याच सुधारित (कमी) एमआरपीने खते विकली जातील,” असे इफ्कोने त्यांच्या विक्रेत्यांना कळविले आहे. जादा किंमतीने  जादा किंमतीने 
 

तक्रार कोठे करता येईल

शेतकऱ्यांना खतांबाबत कोणतीही समस्या आल्यास कृषी आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाकडून दखल घेतली जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांना ८४४६१ १७५०० या भ्रमणध्वनीवर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या दरम्यान तक्रार करता येईल. याशिवाय आयुक्तालयाने १८०० २३३ ४००० हा टोल फ्री क्रमांक देखील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
 
मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा
टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 
https://www.krushikranti.com/whatsapp-groups/
 
संदर्भ:- ऍग्रोवन

Leave a Comment