दैव देते,कर्म नेते! वाढीव अनुदान लाभ शेतकऱ्याला नाहीच…? – उत्तम पुणे

दैव देते,कर्म नेते! वाढीव अनुदान लाभ शेतकऱ्याला नाहीच…? – उत्तम पुणे

 
राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यासाठी विविध अनुदान योजना राबवत असते.त्यात त्यांचा हिस्सा ठरलेला असतो.नुकतेच राज्याचे कृषी मंत्री मानानिय,दादाजी भुसे साहेब यांनी अल्पभूधारक व सामान्य शेतकऱ्यांना तुषार व ठिबक अनुदानात वाढ केल्याचे जाहीर केले. पूर्वी अल्पभूधारक ५५% व सामान्य शेतकरी ४५% अनुदान होते.त्यात अनुक्रमे २५% व ३०% ची वाढ करून अल्पभूधारक ८०% तर सामान्य शेतकऱ्याला ७५% अनुदान तुषार व ठिबक वर ५ हेक्टर मर्यादेपर्यंत मिळणार आहे.

दैव देते,कर्म नेते…!

राज्य कृषी विभागमार्फत अनुदानात वाढ केली असली तरी मागील काही दिवसात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर तेल दरवाढीचा परिणाम सर्वच वस्तूचे दर हे ४० ते १००% टक्के वाढले.त्यातच पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढल्याने पी. व्ही.सी.पाईप,तुषार व ठिबक संच पाईप (Hdpe paip)यांचे किमतीत वाढ झाली.
यापूर्वी २७,०००₹ मिळणारा तुषार संच ३४,०००₹ वर गेला.म्हणजे सामान्य शेतकऱ्याला ७५% अनुदान मिळणार असले तरी त्याच पटित किंमत वाढ झाल्याने, वाढीव अनुदान त्यातच जाणार आहे. त्याचे हाती काहीच लागणार नाही.म्हणून झालेली अनुदान वाढ ही “दैव देते अन् कर्म नेते” या म्हणीत बसणारी असल्याचे मत ब्राम्हणगावं येथील प्रयोगशील शेतकरी व शेती प्रश्नाचे अभ्यासक , उत्तम पुणे यांनी व्यक्त केले.

भिस्त ग्रामीण उद्योजक व विक्रेत्यांवर ..!

एकूणच शेतकरी हिताचा विचार करून अनुदान वाढ झाली.याचा प्रत्येक्षात लाभ शेतकऱ्यांना मिळणे साठी ग्रामीण उद्योजकांनी गुनवत्तेत बदल न करता माफक नफा घ्यावा.तसेच विक्रेत्यांनी कमिशन मध्ये वाढ न करता पूर्वी इतकेच ठेवले तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.भविष्यात जास्तीत जास्त शेतकरी सिंचन साधने खरेदी करू शकतील.तरच राज्यासह देशाचे भूक्षेत्र सूक्ष्म सिंचन खाली येईल.नाहीतर अनुदान वाढ ही एक मृगजळ ठरेल.
लेखक: शेतकरी असून शेतीविषयक प्रश्नाचे अभ्यासक आहेत.
श्री: उत्तम बादशहा पुणे (आडनाव पुणे )
बी.कॉम.एम.ए.(अर्थशास्त्र)
मो.न.९९२२८२७६१३
मु. ब्राम्हणगावं
ता.कोपरगाव
जिल्हा.अहमदनगर
पिन.४२३६०१

Leave a Comment