शेत जमीन खरेदी-विक्री नियम आणि कायदे सर्वांना उपयुक्त अशी माहिती अवश्य वाचा

शेत जमीन खरेदी-विक्री नियम आणि कायदे सर्वांना उपयुक्त अशी माहिती अवश्य वाचा
 

खरेदीच्या नोंदी:-

 
शेत जमीन खरेदी जमीनीची खरेदी व विक्री हा दोन पक्षकारांमधील साधासरळ व्यवहार न राहता अनके वेळा तो विविध कायदेशीर तरतुदींमुळे किंवा लोकांच्या प्रवृत्तीमुळे सरळ व्यवहार ठरत नाही. किंबहुना शेतकऱ्यांमधील दाव्यामुळे सरळपणे न झालेल्या खरेदी – विक्री  व्यवहारांचे प्रमाण फार मोठे आहे.
उदा. एखादा शेतकरी मुलीच्या लग्नासाठी दुसऱ्याकडून हातउसने पसै घतो. पीक आल्यानंतर पैसे फेडायची बोली असते.
काहीतरी अडचण यते किंवा पिकाची अपेक्षित किंमत येत नाही आणि त्यामुळे दिलेला शब्द मोडला जातो. मग दुसरा शेतकरी तुमच्याने पैसे फिरायचे नाहीत असे म्हणतो.
गावातील प्रतिष्ठितांसोबत बैठका होतात उधार दिलेले पैसे वेळेत परत येत नाहीत असे लक्षात आल्यावर जमीन लिहून घेण्याचे ठरते आणि इच्छा नसताना देखील पैसे घेतलेल्या शेतकऱ्याला खरेदी खत किंवा साठे खत करून द्यावे लागते.
नंतर नोंद होताना मात्र नोंदणी विरोधात तक्रार केली जाते किंवा ताबा देताना भांडणे सुरु होतात. अशा प्रकरणात खरोखर व मनापासून खरेदीखत झालेले नसते. परंतु कायदेशीररित्या जमिनीचा व्यवहार पूर्ण झालेला असतो.
प्रत्येक वेळी हेच कारण असेल असेही नाही. कधी कधी राजकीय किंवा सामाजिक कारणावरून जमिनीचे व्यवहार नोंदविताना अडवणूक केली जाते.
 

हे पण वाचा:- आता घर बसल्या ५ मिनिटांत काढा शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा

 

खरेदी – विक्री व्यवहारामध्ये मूलतः खालील ४ घटक महत्वाचे असतात:- शेत जमीन खरेदी-विक्री

 
१. जमीन विक्री करणारा जमीनीचा मालक.
२. जमीन खरेदी घेणारा खरेददार इसम.
३. जमीनीमधील जमीनीची ठरलली किंमत.
४. जमिनीच्या खरेदीबद्दल प्रत्यक्षरित्या होणार रजिस्टर व्यवहार एवढया चारच महत्वाच्या व ठळक पैलू असणाऱ्या या खरेदी विक्री व्यवहारामधून मात्र असंख्य प्रकारचे दवे उभे राहताना आपण पाहतो. या सर्व दाव्यांमागे खरेपणा नसणारा माणूस उभा आहे हे निर्विवादपणे लक्षात घेतले पाहिजे.
उदा. जमीन ज्यांच्या नावावर आहे तो खरेदीदार स्वतःला मालक म्हणवतो व मालक म्हणूनच दुसऱ्याला खरेदीखत करून देतो व त्यानंतर त्याचा भाऊ किंवा नातेवाईक या जमिनीत हिस्सा आहे व मलाही या जमिनीचा मोबदला रक्कम मिळायला पाहिजे असा दावा करून दिवाणी न्यायालयात जातो व मनाई मागतो.
या उदाहरणात कागदावरचा जमीन मालक एक व त्याच्यामागे दडलेले व दावा करणारे असंख्य जमीन मालक हा एक पैलू आहे.त्यामुळे खरेदी विक्री करताना खालील प्रत्येक टप्प्यावर योग्य ती दक्षता घेतली पाहिजे.
 

जमीन खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी:-

 
वास्तविक जमिनीचे व्यवहार करण्यापूर्वी जमिनीच्या संदर्भात खरेदीदाराने खालील मुद्यांवर खात्री केली पाहिजे.
१. जमिनीचा चालू ७/१२ उतारा
२. ७/१२ प्रमाणे प्रत्यक्ष जमीन मालकाचे नाव.
३. ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासून किंवा त्यामागेही जाऊन साधारण १९४७-४८ चे ७/१२ उतारे पाहून हि जमीन या माणसाच्या नावावर कशी झाली याबाबतची खात्री.
४. जमिनीमध्ये नाव न नोंदवलेले मात्र जमिनीत हिस्सा मागू शकतील असे काही कायदेशीर हिस्सेदार आहेत का याची खात्री.
५. जमिनीच्या इतर हक्कांमध्ये बँकेचा किंवा अन्य वित्तिय संस्थेचा भार आहे का?
६. जमीन प्रत्यक्ष मालकाच्याच वहिवाटीच्या आहे का?
७. मालकाच्या वहिवाटीच्या नसल्यास प्रत्यक्ष वहिवाट करणाऱ्या किंवा जमीन ताब्यात असणाऱ्या व्यक्तीच्या हक्कांचे स्वरूप.
८. इतर हक्कांमध्ये कुल किंवा अन्य व्यक्तींचे हक्क.
९. जमिनीच्या नावावर असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष ताब्यातील क्षेत्र.
१०. ७/१२ वर किंवा तोंडी सांगितल्या जात असलेल्या विहिरी व झाडे इत्यादी तपशिलाची प्रत्यक्ष खात्री
११. सर्वसाधारणपणे गावामध्ये अशा प्रकारच्या जमिनीचे चालू असलेले बाजारभाव
१२. संभाव्य जमीन व्यवहारामुळे प्रस्थापित असलेल्या वत्याही कायद्याचा भंग होतो का? याची खात्री केली गेली पाहिजे. तुकडेबंदी कायदा, पुनर्वसन कायदा,भूसंपादन कायदा,नागरिकमल जमीन धारण कायदा इत्यादींचा समावेश होतो.
 

जमीन खरेदी व्यवहार नोंदविताना घ्यावयाची काळजी:-

 
जमिनीचे व्यवहार एकदा तोंडी किंवा चर्चेने ठरल्यानंतर खालील बाबतीत काळजी घेतली पाहिजे.
१. जमिनीची नोंदणी रजिस्टर पद्धतीनेच केली पाहिजे. ५ रु . १० रु किंवा अन्य प्रकारच्या स्टॅम्प पेपर वर सह्या घेऊन व्यवहार पूर्ण होत नाही. भारतीय नोंदणी कायद्यानुसार १०० रुपयेपेक्षा जास्त किंमत असलेल्या मिळकतीच्या बाबतीत व्यवहार हा रजिस्टर असला पाहिजे.
२. खरेदीखताच्या प्रत्यक्ष लिहिण्याच्या मजकुराचे स्वरूप: माहितीगार व्यक्तीकडून किंवा वकिलामार्फत व्यवहाराचे स्वरूप लिहिले गेले पाहिजे.
यामध्ये पुढील अनेक वर्षाचा विचार करून खरेदीखतात कोणकोणत्या बाबींचा उल्लेख केला गेला आहे व विषेशतः पुन्हा वाद निर्माण होऊ शकतील का अशा बाबी आहेत का हे तपासले पाहिजे.
उदा. सामायिक विहिरीतील हिस्सा, पाण्याच्या पाळ्या, फळझाडामधील हिस्से, बांधावरील झाडे व जमिनीवरील झाडे यांचा स्पष्ट उल्लेख, शेत किंवा घराच्या किमतीचा स्पष्ट उल्लख असला पाहिजे.
३. प्रत्यक्ष जमिनीची रक्कम कशा पद्धतीने दिली जाणार आहे हे ठरवूनत्याप्रमाणे व्यवहार केला पाहिजे आणि त्याचा उल्लेख खरेदीखतात असला पाहिजे.
४. रजिष्ट्रेशन च्या वेळी साक्षीदार हे प्रतिष्ठित व आपला शब्द न बदलणारे असले पाहिजे.
५. रजिष्ट्रेशनसाठी आवश्यक असणारे व शासनाच्या नियमानुसार द्येय असणारी स्टॅम्प ड्युटी व रजिष्ट्रेशन फी याची खात्री केली पाहिजे.
६. आवश्यक असेल तेव्हा आयकर खात्याचे प्रमाणपत्र घेतले पाहिजे.
 

हे पण वाचा:-  सुधारित पद्धतीने करा केळी लागवड

 

जमीन खरेदीनंतर खातेदाराने घ्यावयाची काळजी:-

 
१. ज्या महिन्यात जमिनीचा व्यवहार नोंदविला गेला आहे त्या पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत अशा व्यवहारांची यादी सब रजिस्ट्रार कार्यालयातून तहसीलदारामार्फत तलाठ्याकडे पाठविली जाते.
त्यामुळे साधारणपणे पुढील महिन्याच्या १० तारखेनंतर या व्यवहाराची सूची तलाठ्याकडे प्राप्त होते. त्या दरम्यान तलाठ्याकडे सूची-२ ची माहिती आली आहेका याची खात्री करावी. अन्यथा वर्दी अर्ज व त्यासोबत रजिस्टर खरेदीखताची प्रत जोडूनि तलाठ्याकडे अर्ज द्यावा.
२. जमीन खरेदी करणाऱ्या सर्व जमीन मालकांचे पत्ते एका कोऱ्या कागदावर लिहून ते वर्दी अर्जासोबत जोडावेत. त्याचप्रमाणे खरेदी घेतलेल्या जमिनीचे ७/१२ व ८-अ चे उतारे जोडावेत.
३. वर्दी अर्ज किंवा सूचीवरून फेरफार नोंद गावी दप्तरी लिहिली जाते व त्यांनतर फेरफाराची नोटीस संबंधितांना दिली जाते. खरेदीदाराने स्वतःहून हि नोटीस प्राप्त करून घेणे त्याच्या हिताचे आहे.
४. मुर्तीचा १५ दिवसाच्या आत हितसंबंधी व्यक्ती या फेरफार नोंदीबद्दल हरकत घेऊ शकता. अशा काळात मूळ जमीन मालकाने नोंद करण्यास हरकत नसल्याचे पात्र पाठविले आहे कि नाही याची खात्री केली पाहिजे. शेत जमीन खरेदी-विक्री
५. फेरफार नोंदीची नोटीस मिळाल्यानंतर या नोटिसीमध्ये प्रत्येक तपशील बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी. विशेषतः खरेदीचा दिनांक, दस्त क्रमांक, सर्व व्यक्तींचे नावे, खरेदी केलेल्या जमिनीचे गट नंबर, त्याचे क्षेत्र, आकार, यांचा अचूक उल्लेख हे सर्व तपासून घ्यावे.
६. अशा प्रकारे फेरफार नोंद लिहून त्यानंतर किमान १५ दिवसाची नोटीस देऊन झाल्यांनतर व कोणाचीही हरकत आली नाहीतर मंडळ अधिकारी हि नोंद प्रमाणित करतात.
नोंद प्रमाणित केल्याबद्दल दोन ओळींचा स्पष्ट आदेश फेरफार नोंदीच्या शेवटच्या रकान्यात केला जातो. त्यामध्ये साधारणपणे खालील प्रकारचा मजकूर असतो.
उदा. अ. नोंदणीकृत खरेदीखतावरून पडताळून लिहिले. संबंधितांना नोटीस रुजू हरकत नोंद प्रमाणित. आ. संबंधितांना नोटीस बजावली. या व्यवहारामुळे पुनर्वसन कायद्याचा भंग होतो त्यामुळे नोंद रद्द करण्यात येत आहे. शेत जमीन खरेदी-विक्री शेत जमीन खरेदी-विक्री शेत जमीन खरेदी-विक्री
७. फेरफार नोंद प्रमाणित केल्यानंतर लगेचच ७/१२ वर या नोंदीचा अंमल दिला जातो व ७/१२ वरील नवे दुरुस्त केली जातात. त्यांनतर दुरुस्त झालेले ७/१२ व ८-अ चे उतारे प्राप्त करून घेऊन खरेदीदार व्यक्तीने आपल्या संग्रही ठेवले पाहिजे. शेत जमीन खरेदी-विक्री शेत जमीन खरेदी-विक्री शेत जमीन खरेदी-विक्री
 

हे लक्षात ठेवा:- शेत जमीन मोजणी 

 
१. खरेदीच्या नोंदीमध्ये वाद झाला तर तो महसूल अधिकाऱ्यापुढे चालतो परंतु मुळातच जमिनीचा मालकी हक्क आहे किंवा नाही असा वाद निर्माण झाल्यास असा वाद दिवाणी न्यायालयापुढे चालतो.
२. शक्यतो थेट जमीन मालकाशी व्यवहार करावेत.
३. मध्यस्थांमार्फत मुखत्यारपत्राच्या आधारे व्यवहार होत असतील तर मूळ जमीन मालकाकडे देखील विचारणा करून खात्री केली पाहिजे व मुखत्यारपत्र अस्तित्वात असल्याबाबत सुद्धा खात्री केली पाहिजे.
४. जमीन ताब्यात जरी लगेच मिळाली असली तरी खरेदीची नोंद सुद्धा लगेचच होईल असे पहिले पाहिजे. उशिरा नोंदी झाल्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत वाढू शकते.
५. अर्धवट व्यवहार करणे टाळले पाहिजे व एकाच वेळी पूर्ण व्यवहार करून तो नोंदविला गेला पाहिजे.
संदर्भ:- शेती आणि उद्योग शेत जमीन खरेदी शेत जमीन खरेदी शेत जमीन खरेदी शेत जमीन खरेदी
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या


shet jamin kharedi kayda, शेत जमीन खरेदी नियम, जमीन खरेदी विक्री नियम, जमीन खरेदी विक्री नियम pdf ,agri maharashtra , agriculture information ,agriculture department , sheti vishyak mahiti , शेती विषयक माहिती , शेती माहिती 

10 thoughts on “शेत जमीन खरेदी-विक्री नियम आणि कायदे सर्वांना उपयुक्त अशी माहिती अवश्य वाचा”

 1. मुस्लिम लॉ प्रमाणे १९७५ ला वारसांच्या नोंदी असताना देखील क्षेत्र हक्क सोडपत्र न घेता विकले जाते, तर ते जुने व्यव हार रद्द होवून उर्वरित वार सांचे हिस्से त्यांना कशाप्रकारे मिळतील. मार्गदर्शन करावे हि विनंती.
  7385445356

  Reply
 2. सन 2010 मध्ये वडिलोपार्जित शेतीचा विक्री व्यवहार झाला असून दोन भाऊ व एक बहिण आहे, आई वडिल आहेत, बहिण कायदेशीर वारस असूनही ती विक्री व्यवहारास तिला सोडून इतर सगळे उपस्थित होते, बहिणीला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळाली नाही,आता जवळ – जवळ 10 वर्षे शेती खरेदी घेणाऱ्यांच्या नांवावर ताब्यात आहे, तिला या व्यवहाराची माहिती या वर्षी 10 वर्षानंतर समजली आता ती बहिण दिवाणी दावा दाखल करू शकते काय ? आता काही उपयोग होईल की नाही,? कृपया, मार्गदर्शन करा

  Reply
 3. आमच्या तिघामध्ये सामाईक जमीन व त्यात एक विहीर आहे. तिघापैकी दोघांना त्यांच्या हिश्याची जमीन विकायची आहे तर विहीरीचे वाटप कसे करावे

  Reply
 4. लग्न झालेल्या मुलीने, विधवा आईकडून 0 हे. 60 आर जमीन खरेदी केली आहे. (विकत घेतली आहे).. परंतू मुलगी वा तिचा पती शेतकरी नसल्याचे कारण पुढे करून मंडळ अधिकारींनी नोंद व खरेदी नामंजूर केली आहे..
  मुलीच्या पतीच्या नांवे प्रकल्पग्रस्त दाखला आहे.. जो त्यांना थोरला भाऊ अकाली मयत झाल्याने हस्तांतरण होऊन कायद्यानेच मिळाला आहे .. (दाखला सुरुवातीला 1990 साली काढणेत आला व अद्याप उपयोग शुन्य आहे.).
  मंडळ अधिकारी यांचे म्हणणेनुसार दाखला जुना आहे व आज रोजी पती-पत्नी शेतकरी दिसत नाही… म्हणून खरेदी नामंजूर.. कृपया मार्गदर्शन करावे

  Reply
 5. I have purchased agriculture dry land and given application to register in 7/12 in2016 but talathi has forgotten to do it now present talathi is not ready to register in 7/12 on the grounds that 11 gundas dry land can’t be registered, but when it purchased it was bagaet CULTIVATED land ,what is the legal solution

  Reply
 6. एनआरआय असणार्‍या व्यक्तीस महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी घेता यते का

  Reply

Leave a Comment