कांदा लागवड कशी करावी

कांदा लागवड कशी करावी

 

पिकाची माहिती (Crop information)

कांदा हे पीक कमी (onion cultivation) कालावधीत येणारे, तुलनात्मक दृष्ट्या कमी भांडवली खर्चाचे परंतु जास्त उत्पन्न देणारे व्यापारी पीक आहे. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे.
महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्‍दा काही जिल्‍हयांमध्‍ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्‍हा हा महाराष्‍ट्रात नव्‍हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्‍यात प्रसिध्‍द आहे. एकूण उत्‍पादनापैकी महाराट्रातील 37 टक्‍के तर भारतातील 10 टक्‍के कांद्याचे उत्‍पादन एकटया नाशिक जिल्‍हयात घेतले जाते. कांदा लागवड कशी करावी How to plant onions
 

हे वाचा:-  सुधारित तंत्रज्ञान रब्बी ज्वारी पेरणी

 

जमिनीचा प्रकार (Type of soil)

पाण्‍याचा उत्तम निचरा असणारी, भुसभूशीत, सेंद्रिय खतांनी परिपूर्ण असलेली मध्‍यम ते कसदार जमिन कांद्याला चांगली मानवते.
 

हवामान (Weather)

कांदा (onion) हे हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्‍ट्रातील सौम्‍य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ कांदा वाढीस उपयुक्‍त असते.
 

पिकाची जात (Crop variety)

लाल कांदा -भीमा किरण, भीमा शक्ती, एन२-४-१, अर्का निकेतन,लाइट रेड. पिवळा कांदा, फुले सुवर्णा,अर्का पीतांबर या जाती चांगल्या आहेत भारतीय बाजारपेठेत पिवळ्या रंगाच्या जातींची मागणी कमी आहे,परंतु युरोपीय बाजारपेठेसाठी या जाती उपयुक्त आहेत.
पिवळा रंगाची अर्ली ग्रानो ही जात मैदानी भागात रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे.पांढरा कांदा, भीमा श्‍वेता, फुले सफेद, व्हाइट पांढरा कांद्याची लागवड अकोला, नागपूर, अमरावती, जळगाव व धुळे जिल्ह्यात होते.

लागवड (Planting)

रोपे तयार करणे – खरीप पिकासाठी गादी वाफ्यावर रोपे तयार करतात .रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सपाट वाफ्यावर रोपे तयार केली जातात. १ हेक्टर लागवडीसाठी १५ ते २० आर (गुंठे ) वर तयार केलेली रोपे पुरेशी पडतात. हेक्टरी १० किलो बी लागते. रोपे तयार करण्यासाठी जमीन भुसभुशीत करून त्यात ४ -५ गाड्या कुजलेले शेणखत आणि २.५ किलो नत्र, व ५ किलो स्फुरद टाकतात .बियाणे ५ सेंटिमीटर आणि २ सेंटिमीटर खोलीवर पेरतात. ६ ते ८ आठवड्यात रोपे लागवडीस तयार होतात. पेरणी आधी बी ३ ग्राम थायरम हे बुरशीनाशक १ किलो बियाण्यास या प्रमाणात चोळतात.
खरीप कांदयाची रोपे ६ ते ७ आठवडयांनी व रब्‍बीची ८ ते ९ आठवडयांनी तयार होतात. रोपे काढण्‍यापूर्वी २४ तास अगोदर गादी वाफयास पुरेसे पाणी द्यावे. कांदयाची लागवड गादी वाफयावर तसेच सरी वरंब्‍यावर करता येते. सपाट वाफयामध्‍ये हेक्‍टरी रोपांचे प्रमाण जास्‍त असले तरी मध्‍यम आकाराचे एकसारखे कांद्याचे उत्‍पादन मिळते. सपाट वाफा दोन मीटर रूंद व उताराप्रमाणे वाफयांची लांबी ठेवावी. रोपांची लागवड सकाळी अथवा संध्‍याकाळी करावी. रोपांची लागवड १२.५ बाय ७.५ सेमी अंतरावर करावी.
 

खत व्यवस्थापन (Fertilizer management)

प्रति हेक्‍टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ६० किलो पालाश व ५० किलो गंधकयुक्त खते द्यावीत. यापैकी १/३ भाग नत्र, संपूर्ण स्फुरद,पालाश व गंधक लागवडीच्या वेळी आणि राहिलेले नत्र दोन हप्त्यात विभागून द्यावे.

पाणी व्यवस्थापन (Water management)

कांदा पिकाला नियमित पाणी देणे महत्‍वाचे असते. खरीप हंगामात १० ते १२ दिवसाच्‍या अंतराने तर उन्‍हाळी रब्‍बी हंगामात ६ ते ८ दिवसांनी जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
 

रोग नियंत्रण (Disease control)

किडी -फुलकिडे, टाक्या – मुरड्या, पाने कुडतडणारी अळी ह्या किडी पडतात. उपाय – किडींच्या नियंत्रणासाठी रोपे लावल्या नंतर ३ आठवड्या नंतर १० मिली मॅलॅथिऑन ५० सीसी १० लिटर पाण्यात मिसळून आवश्यकते नुसार १५ दिवसांनी फवारावे. रोग – करपा ,काळा करपा हे रोग पडतात. या रोगामध्ये पातीवर तांबूस लांबट गोल ठिपके किंवा पट्टे पडतात आणि पात शेंड्याकडून वाळू लागते. उपाय – नियंत्रणासाठी २५ ग्राम डाइथेन एम ४५ (७५ डब्लू पी ) १० लिटर पाण्यात मिसळून ८ ते १० दिवसांचा अंतराने २ ते ३ वेळा फवारतात. 
 

उत्पादन (Production)

कांदयांचे पीक लागवडीनंतर ३ ते ४.५ महिन्‍यात काढणीस तयार होते. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत पिवळा पडतो व पात आडवी पडते. यालाच मान मोडणे असे म्‍हणतात. ६० ते ७५ टक्‍के माना मोडल्‍यावर कांदा काढणीस पक्‍व झाला असे समजावे.
कुदळीच्‍या साहारूयाने आजूबाजूची जमिनी सैल करून कांदे उपटून काढावेत. काढणीनंतर ४,५ दिवसांनी कांदा पातीसकट शेतात लहान लहान ढिगा-याच्‍या रूपाने ठेवावा. नंतर कांदयाची पात व मळे कापावे. पात कापताना ३ ते ४ सेमी लांबीचा देठ ठेवून पात कापावी. यानंतर कांदा ४ ते ५ दिवस सावलीत सुकवावा. हेक्‍टरी उत्‍पादन२५० ते ३०० क्विंटल मिळते. कांदा लागवड कशी करावी 
 

आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या
—————————————————————————————————————————————————–

kanda lagwad mahiti , शेती विषयक माहिती , sheti vishayak mahiti, sheti vishayak mahiti in marathi pdf , उन्हाळी हंगामातील पिके , कांदा लागवड कशी करावी , कांदा लागवड व्यवस्थापन , हिवाळी पिके

Leave a Comment