कापूस लागवड माहिती
नगदी पिकात महत्त्वाचे पीक कापूस असून पांढरे सोने म्हणून त्यास संबोधले जाते. देशात उत्पादन होणार्या क्षेत्रापैकी सर्वसाधारण १/३ क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्रात सुमारे २५ ते २७ लाख हेक्टर क्षेत्र असून त्यातील जिरायत क्षेत्राचे प्रमाण जास्त असून बागायत क्षेत्र ३ ते ४ टक्के आहे. प्रामुख्याने ज्या भागात उन्हाळी पीक घेतले जाते त्या भागातच कमी पाण्यात व ६ महिन्यात बागायत कापूस पिकाचे उत्पादन चांगले मिळत असल्याने आर्थिक गरजेसाठी या पिकास जास्त महत्त्व प्राप्त होते. कापूस लागवड माहिती Cotton planting information
जमिनीचा प्रकार
मध्यम ते खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी योग्य असते.
हवामान
कापूस साठी उबदार व कोरडे हवामान आवश्यक असते. उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सियस,२० ते २७ अंश सेल्सियस हें अधिक वाढी साठी लागते. उष्ण दिवस व थंड रात्र या प्रकारचे हवामान बोन्डे भरण्यासाठी व उमलण्याची लागते.
कापूस पिकाची जात Cotton crop variety
लागवड
कापूस लागवडी kapus lagwad mahiti च्या वेळी खोल नांगरट करून घ्यावी व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन घ्याव्या. जमीन भुसभुशीत करून घेऊन त्यात ८ ते १० टन कुजलेले शेणखत टाकावे. कापूस लागवडी पासून ३० ते ३५ दिवस पाते, ५० ते ५५ दिवस फुले, ९० दिवसांनी बोन्डे तयार होतात. १२० दिवसांनी कापूस वेचणीला येतो कोरड वाहू साठी अंतर ९० X ३० से मी भारी जमीन,हलक्या जमिनीत ६० X ३० से मी बागायती साठी १५० X ३० से मी वर लागवड करावी.
कापूस खत व्यवस्थापन Cotton Fertilizer Management
लागवडी च्या वेळी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश संकरित वाणांसाठी देणे. सुधारित वाणांसाठी ८० किलो नत्र, ४० स्फुरद, ४० पालाश देणे.
पाणी व्यवस्थापन
बियाणे लागवड करण्या आधी जमिनीला पाणी देणे आवश्यक असते. पिकाच्या वाढीची अवस्था, पाती अवस्था, पिक फुलोऱयात येताना, बोन्डे भरताना या महत्वाचा अवस्थेत पाणी देणे आवश्यक असते.
रोग नियंत्रण
किडी : मावा,तुडतुडे,फुलकिडे,पांढरीमाशी – या किडी पिकाच्या सुरवाती च्या काळात रसशोषण करतात.
उपाय –
१) टाटा माणिक ,अरेवा/उलाला – ८ ते १० ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे.
२) अमेरिकेनं बोन्डे अळी – फेरोमन सापळे हेक्टरी ५,निमार्क ५ टक्के फवारणी करावी.
३) ठिपक्यांची बोन्डे अळी -निमार्क ५ टक्के फवारणी करावी.
४) शेंदरी बोन्डे अळी – क्लोरोपायरीफॉस ५० ई.सी २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे.
रोग :
१) बुरशीजन्य करपा, जिवाणूजन्य करपा उपाय-कोपेरॉक्सिकॉलराइड १५०० ग्राम ५०० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने २ वेळा फवारणी करावी.
२) मर व मूळकूज – झाड वळून जाते व मुळ्या कुजतात. उपाय – ३ ग्राम प्रति किलो थायरम किंवा ट्रायकोड्रामाची बीज प्रक्रिया करावी तसेच रोग प्रतिकारक जातीची लागवड करावी.
उत्पादन
कापसाची काढणी- ३० ते ४० टक्के बोन्डे फुटले की पाणी देणे बंद करावे. रोगग्रस्त कापूस काढून १५ ते २० दिवसाच्या अंतराने काढणी करावी पूर्ण पक्व व पूर्ण उमललेली कापसाची बोन्डे काढावी. सरासरी सुधारित वाणाच हेक्टरी २० ते २४ क्विंटल तर संकरित हेक्टरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. कापूस लागवड माहिती
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या