Karj Mafi : ‘या’ जिल्ह्यातील 470 कोटी रुपयांची कर्जमाफी, कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ?

Karj Mafi : ‘या’ जिल्ह्यातील 470 कोटी रुपयांची कर्जमाफी, कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ?

 

महाविकास आघाडी सरकार स्थापन होताच ज्या  कर्जमाफीची घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी अजूनही सुरुच आहे. प्रक्रिया पू्र्ण करुन वर्धा जिल्ह्यातील 53 हजार 212 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ झाला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करुन त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती  योजना सुरु केली. याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. असे असले तरी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अजूनही प्रोत्साहनपर रकमेचा लाभ झालेला नाही. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा करुनही अजून अंलबजावणी झालेली नाही.

नियम अटींचे पालन करणाऱ्यांना माफी

जिल्हयात या योजनेच्या अटी व शर्तीस पात्र ठरणा-या शेतक-यांची नावे ऑनलाईन अपलोड करण्याच्या सूचना सर्व बँकांना करण्यात आल्या होत्या. बँकांनी अपलोड केलेल्या 54 हजार 793 खातेदार शेतक-यांचे आधार प्रमाणिकरणाकरीता पोर्टल उपलब्ध झाले होते. यापैकी आधार प्रमाणिकरण प्रक्रीया पुर्ण झालेल्या 53 हजार 212 शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीची ही रक्कम 470 कोटी रुपये इतकी असून ही रक्कम राज्य शासनाच्या वतीने शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आता केवळ 1 हजार 122 खात्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक असून प्रमाणिकरणाची कारवाही सुरु आहे.

8 हजार शेतक-यांना व्याज सवलत

राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खाजगी बँकांकडून पिककर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणा-यांना शासनाच्या वतीने कर्जावरील व्याजात सवलत दिली जाते. जिल्हयात सन 2021-22 या आर्थिक वर्षात मार्च 22 अखेर घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड करणा-या 8 हजार शेतक-यांना 1 कोटी 85 लाख रुपयांची व्याज सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे योजनेच्या लाभ त्यांना घेता आला.

हे पण वाचा:- पंजाब डख हवामान अंदाज : राज्यात आजपासून ते 20 मे पर्यंत या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस…!

लाभासाठी आधार प्रमाणीकरणाचे मोहिम

शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना देण्यात यावा. उर्वरीत लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाची मोहिम मोठया प्रमाणावर हाती घेऊन शिल्लक लाभार्थी सुध्दा योजने अंतर्गत समाविष्ठ करुन घेण्यात यावे. या योजनेचे जिल्ह्यात शंभर टक्के काम होणे आवश्यक आहे, असे निर्देश सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार रणजित कांबळे यांनी दिले आहेत.

संदर्भ:- tv9 marathi