केळी लागवड माहिती तंत्रज्ञान
पिकाची माहिती
केळी लागवड क्षेत्राच्या व उत्पन्नाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पन्नात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. भारतात अंदाजे दोन लाख वीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली आहे.
केळी उत्पादन करणा-या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने किंवा परप्रांतात विक्रीच्या दृष्टीने होणा-या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला उत्पादनापैकी सुमारे 50 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. सध्या महाराष्ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळीच्या लागवडीखाली असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्हयांत आहे. म्हणून जळगांव जिल्हाला केळीचे आगार मानले जाते. केळी लागवड माहिती तंत्रज्ञान Banana cultivation information technology
जमिनीचा प्रकार
केळी पिकाला भारी कसदार सेंद्रीय पदार्थयुक्त अशी गाळाची, भरपूर सुपिक, भुसभुशित किंवा मध्यम काळी एक मिटरपर्यंत खोल असलेली व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन मानवते.
हवामान
केळी हे उष्ण कटीबंधीय फळ असून त्यास साधारण उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणतः 15 ते 40 डिग्री अंश से.पेक्षा पर्यंतचे तापमान या पिकास चांगले मानवते.
पिकाची जात
केळीच्या 30 ते 40 जाती आहेत. त्यापैकी बसराई, हरीसाल, लालवेलची, सफेदवेलची, मुठडी, वाल्हा लालकेळी, रोबुस्टा, उधयम, विरूपाक्षी, ग्रँड नैने, कर्पूरवल्ली, मंथन, वेन्द्रन
लागवड
जळगांव जिल्हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्या सुरुवातीस सुरु होतो. यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. लागवड करताना 0.5×0.5x 0.5 मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात. दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता 1.25 x1.25 किंवा 1.50×1.50 मीटर असते.
खत व्यवस्थापन
200 ग्रॅम नत्र 3 समान हप्त्यात लावणीपासून दुस-या तिस-या व चौथ्या महिन्यात द्यावे. प्रत्येक झाडास प्रत्येक वेळी 500 ते 700 ग्रॅम एरंडीची पेंड खतासोबत द्यावी. शेणखता बरोबर 400 ग्रॅम ओमोनियम सल्फेट प्रत्येक झाडास लावणी करतांना देणे उपयुक्त ठरते.
पाणी व्यवस्थापन
भारी सुपिक व खोल जमिनीतील पिकांना 7 ते 10 सेमी पाणी दरपाळीस लागते. उन्हाळयात 6 ते 8 दिवसांनी व हिवाळयात 9 ते 15 दिवसांनी पाणी देतात. अतिकडक उन्हाळयात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे लागते.
रोग नियंत्रण
पनामा (मर) रोग
उपाय- बसराई, लालकेळ, हरीसाल व पुवन या जाती रोग प्रतिकारक आहेत. व्हापाम (112 ग्रॅम) दर 20 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
शेंडा झुपका (बंचीटॉप)
निरोगी कंद व मुनवे वापरावेत. रोग प्रतिकारक जाती बसराई लागवड करावी. मावा किडीचा बंदोबस्त करावा. रोगट झाडे नष्ट करावीत.
किड व खोड भुंगा
पॅरीसगीन औषध अधिक धान्याचे पीठ (1.5) यांच्या विषारी गोळया करुन कंदाचे जवळ टाकतात. दुषित कंद नष्ट करावेत.
उत्पादन
काढणीच्या वेळी वरच्या फणीपासून २० ते २५ सेमी लांबीचा दांडा ठेवून घड कापावा. प्रदेश, जात व जमिनीच्या प्रकारानुसार केळीच्या उत्पादनाचे प्रमाण बदलू शकते. केळी लागवड माहिती तंत्रज्ञान
हे वाचा:- शेत जमीन खरेदी-विक्री नियम आणि कायदे सर्वांना उपयुक्त अशी माहिती अवश्य वाचा
हे वाचा:- आता घर बसल्या ५ मिनिटांत काढा शेत जमिनीचा ऑनलाईन नकाशा
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या