Kharif Season : खत पुरवठ्यापासून पेरणीपर्यंत कृषी विभागाचे नियोजन

Kharif Season : खत पुरवठ्यापासून पेरणीपर्यंत कृषी विभागाचे नियोजन

 
जालना: रब्बी हंगामाप्रमाणेच खरिपातील उत्पादकता वाढावी यासाठी कृषी विभाग कामाला लागला आहे. हंगामात बियाणे, खते याची टंचाई भासणार नाही याबाबत योग्य ते निर्णय जिल्हा पातळीवर घेतले जात आहेत. संभाव्य खत-टंचाई लक्षात घेता खतांची साठवणूक करुन कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता कृषी विभागाकडून घेतली जाणार आहे. एवढेच नाही तर ठरवून दिलेल्या दरातच कृषी निविष्ठांची उपलब्धता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर करण्याच्या अनुशंगानेही प्रयत्न केले जात आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी.एल. जाधव हे कृषी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन याबाबत सूचना करीत आहेत.

असे असणार आहे नियोजन?

खरीप हंगामाला अजून दीड महिन्याचा आवधी असला तरी पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना खत, बियाणे, औषधे व तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांना पुरवले जाणार आहे. पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील उत्पाकतेमध्ये वाढ होत आहे. त्याच दृष्टीने खरिपातील उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे बीज प्रक्रिया, सोयाबीन उगवण क्षमता आणि पेरणीबाबत योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. या सर्व प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी कृषी अधिकाऱ्यांना व्हिडीओ देखील करावा लागणार आहे.
हे पण वाचा : उन्हाळी सोयाबीन बहरात असतानाच कृषी विभागाचा अंदाज काय?

रासायनिक खताचा तुटवडा पण योग्य नियोजनामुळे प्रश्न मिटणार

यंदा रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम रासायनिक खत पुरवठ्यावर झाला आहे. मे महिन्यातच मागणीनुसार खताचा पुरवठा होत असतो. मात्र, यंदा अद्यापपर्यंत खताचा पुरवठा झालेला नाही. पण सरकारने साठवणूक केलेला आणि नव्याने पुरवठा झालेल्या खताचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. डीएपी खताची मागणी अधिक असल्याने त्यामध्ये अनियमितता होणार नाही यासाठी भरारी पथके नेमण्यात आली होती.

कृषी सहसंचालकांच्या काय आहेत सूचना?

कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांशी समन्वय साधून रासायनिक खते, बियाणे, अवजारे फवारणी यंत्रे याची उपलब्धता ही महाडिबीटीद्वारे द्यावी लागणार आहे. पारंपरिक पिकांपेक्षा नगदी पिकांचे क्षेत्र कसे वाढेल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे लागणार असून घरचे बियाणे वापराबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सोयाबीन हे मुख्य पीक असून त्याची उगवण क्षमता ही अधिकाऱ्यांनाच तपासावी लागणार आहे.
source : tv9marathi

Leave a Comment