Land Aadhaar Card: आता जमिनीचेही मिळणार आधारकार्ड, वाचा सविस्तर…!

Land Aadhaar Card: आता जमिनीचेही मिळणार आधारकार्ड, वाचा सविस्तर…!

 

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता जमिनीचा रेखांश, अक्षांश, जमिनीचे (Land) क्षेत्रफळ जमिनीची मालकी या सर्वांची माहिती असलेल्या पिन नंबर थोडक्यात आधारकार्ड शेतकऱ्यांच्या सातबारावर प्रिंट करण्यात येणार आहे.

जमिनीच्या सातबाऱ्यावरती 11 क्रमांकाचा हा ई-मेल पिन दिला जाणार आहे. या माध्यमातून हे आपण आपल्या शेती (Agriculture) किंवा जमिनीचा आधार कार्ड म्हणू शकतो. हे आधार कार्ड (Land Aadhaar Card) बनवण्यासाठी 28 जुलै 2022 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे.

का निर्णय घेतला?

जमिनीची ओळख पटवण्यासाठी, जमिनीची (Agricultural Information) मालकी, जमीन डिजिटल स्वरूपात समजून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट राबविण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक जमिनीला हा इमेल पिन नंबर देण्या बाबद सूचना दिल्या होत्या. या जमिनीच्या आधार कार्डमुळे जमिनीची माहिती ऑनलाईन स्वरूपात मिळणार आहे.

हे पण वाचा:- 50 thousand grant : 50 हजाराच्या अनुदानाची तीन वेळा घोषणा, अंमलबजावणीचे काय?

केंद्र शासनाच्या 24 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रानुसार डिजिटल इंडिया रेकॉर्ड मॉडर्निझेशन प्रोग्रामच्या अंतर्गत संगणकीकरण झालेल्या अधिकार अभिलेखांसाठी क्रमांक देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील जे काही अभिलेख असतील यांच्यासाठी नंबर देण्यात येणार आहेत.

राज्यातील जवळजवळ ग्रामीण भागातील 2.62 कोटी सातबाराकीकरण प्रस्तावित करण्यात आलेला आहे. संघनिकीकरणनुसार निर्माण होणार असून, त्यामध्ये शहानिशा करण्याची व्यवस्था असणार आहे. या जमिनीच्या आधार कार्डमुळे फसवणूक टळणार आहे. डुप्लिकेट कागदपत्रे (Document) यांसारख्या फसवणुकीपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.

source:- कृषी जागरण