शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता इफको कडून ‘नॅनो युरिया’ मार्केट मध्ये लाँच, नॅनो यूरियाचा फायदा काय ?

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता इफको कडून ‘नॅनो युरिया’ मार्केट मध्ये लाँच, नॅनो यूरियाचा फायदा काय ?
 
नवी दिल्ली: इंडियन फार्मर फर्टिलायजर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड म्हणजेच इफकोनं शेतकऱ्यांसाठी नॅनो यूरिया लाँच केला आहे. इफकोच्या 50 व्या वार्षिक बैठकीत याचं लाँचिंग करण्यात आले. सामान्य यूरियाची मागणी 50 टक्केहून कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचे लाँचिगं करण्यात आलं आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना लिक्विड स्वरुपात उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या 500 मिलीमध्ये 40 हजार पीपीएम नायट्रोजन असतो. त्यामुळे यूरीयाच्या 50 किलोच्या बॅग इतकी पोषणतत्वे यामाध्यमातून मिळतील.
 

 हे पण वाचा :- ‘भारतीय हवामान खात्याचा अंदाज’ यंदाच्या मान्सूनमध्ये १०१ टक्के पाऊस पडणार

 
नॅनो यूरियाची किंमत काय? नॅनो यूरिया हा स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. नॅनो यूरिया शेतकऱ्यांना मंगळवार पासून उपलब्ध होईल. नॅनो यूरियाची 500 मिली बॉटल 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. सामान्य यूरियाच्या दहा टक्के किमतीला शेतकऱ्यांना नॅनो यूरिया उपलब्ध होईल. नॅनो यूरियाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जे युरियाच्या गोणीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. इफकोने ऑनलाईन-ऑफलाईन पद्धतीने झालेल्या ५० व्या वार्षिक सामान्य बैठकीत प्रतिनिधी महासभेच्या सदस्यांच्या उपस्थितीत लॉन्च केली आहे. यामुळे शेतकरी युरियाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल, असं डॉ यूएस अवस्थी, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, इफ्को यावेळी म्हणाले. इफ्कोने सांगितले की युरियाचा वापर कमी करण्यात यावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत द्रव्य युरिया लॉन्च करण्यात आले आहे.
इफ्कोच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या वैज्ञानिक आणि अभियंत्यांनी कलोल येथील नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये स्वदेशी आणि प्रोप्रायरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नॅनो यूरिया द्रव तयार करण्यात आले आहे.
हे उत्पादन ‘स्वावलंबी भारत’ आणि ‘स्वावलंबी शेती’ या दिशेने अर्थपूर्ण पाऊल आहे. इफ्कोने आपल्या निवेदनात म्हटले आहे की नॅनो लिक्विड यूरिया वनस्पतींच्या पोषणासाठी प्रभावी आणि प्रभावी असल्याचे आढळले आहे. या वापरामुळे पिकांचे उत्पादन वाढते आणि पोषक द्रव्यांची गुणवत्ता सुधारते. हवामान बदलांवर आणि शाश्वत उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत असताना नॅनो यूरिया भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यात आणि ग्लोबल वार्मिंग कमी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
नॅनो यूरिया द्रव वापरल्यास वनस्पतींना संतुलित प्रमाणात पोषकद्रव्ये मिळतील आणि जमिनीत युरियाचा जास्त वापर कमी होईल. यूरियाचा जास्त वापर वातावरणास प्रदूषित करतो, मातीच्या आरोग्यास हानी पोहचवतो, रोगांचा धोका आणि वनस्पतींमध्ये कीड वाढवितो, उशीरा कापणी करतो व उत्पादन कमी करतो. याव्यतिरिक्त, पिकाची गुणवत्ता देखील कमी होते. नॅनो यूरिया द्रव पिके मजबूत आणि निरोगी बनवते आणि पिकांना पडण्यापासून प्रतिबंधित करते.इफ्को नॅनो यूरिया हे शेतकर्‍यांसाठी स्वस्त आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास प्रभावकारी आहे. इफ्को नॅनो युरिया द्रव्य ५०० मिलीची एक बाटली सामान्य युरियेच्या एका बॅगेप्रमाणे आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. नॅनो युरिया द्रव्याचा आकार लहान असल्याने याला तुम्ही खिश्यात ठेवू शकतात. यामुळे साठवणूक आणि वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे.
शेतकऱ्यांना किफायतशीर पर्याय उपलब्ध
अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. या काळात नॅनो यूरिया हा शेतकऱ्यांसाठी सामान्य यूरियाला चांगला पर्याय ठरणार आहे. बॉटलमध्ये द्रवरुपात नॅनो यूरिया उपलब्ध झाल्यानं वाहतुकीचा खर्च देखील कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील नॅनो यूरियाचा वापर फायेदशीर ठरेल.
 
94 पिकांवर चाचणी
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या अंतर्गत 20 आयसीएआर, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर चाचणी करण्यात आली. यानंतर संपूर्ण भारतातील पिकांवरील परिणामकारकता तपासण्यासाठी 94 पिंकावर चाचणी करण्यात आली. नॅनो यूरियाच्या वापरामुळे पिकांच्या 8 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
 
नॅनो यूरियाचा फायदा काय?
नॅनो यूरियाची निर्मिती आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेती या अंतर्गत करण्यात आली आहे. इफको नॅनो यूरिया पिकांवर प्रभावी ठरला आहे. नॅनो यूरिया जमिनीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील फायदा होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचा प्रभावी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी नॅनो यूरियाचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत होणार आहे. नॅनो यूरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढवण्यासा देखील मदत होणार आहे.
 
मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा
टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 
https://www.krushikranti.com/whatsapp-groups/
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment