मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन, कृषी मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा!
शेतकऱ्यांचे शेतीचे उत्पन्न वाढावे व तसेच मातीचा पोत सुधारावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले शेती क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणे आवश्यक आहे.
जे शेतकरी मागणी करतील अशा प्रत्येक शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल,असे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले. किन्हई येथे भुसे यांच्या हस्ते पीक स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की सेंद्रिय शेती चे प्रमाणीकरण यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठांना बरोबर घेऊन कृषी विभागात एक नवीन कक्ष कार्यान्वित करण्यात येईल.
हे पण वाचा:- सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या महिन्यात’ लवकरच जमा करणार आणखी 2000 रुपये!
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून महिला बचत गट तसेच शेतकरी गट यांना शासनाच्या कृषी विभागातर्फे आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच महिला शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या 30 टक्के योजना आहेत त्याचाही महिला शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना महामारी च्या संकटात सुद्धा सगळे उद्योग धंद्यांचे चाके जागेवर थांबली असताना देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचे काम शेती क्षेत्राने केले.
त्यामध्ये शेतकऱ्यांचा फार मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वेगळ्या प्रकारचे योजना असून त्या प्रत्येक योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी जे जे शक्य आहे ते शासनाकडून केले जाईल अशी ग्वाही देखील यावेळी कृषीमंत्री भुसे यांनी दिली.
source:- कृषी जागर
Thibak shinchan yojana kdhi chalu hoil ani laabh kasha gheta yeil….