मका पिकासाठी खताचे नियोजन कसे करावे?

मका पिकासाठी खताचे नियोजन कसे करावे?

krushi kranti :- संपूर्ण जगात भात (Rice) आणि गहू (Wheat) नंतर मकाचा  मोठ्या प्रमाणात रोजच्या आहारात समावेश होतो. इतर तृणधान्यांच्या तुलनेत मका पीक (maize crop) जमिनीतून मोठ्या प्रमाण अन्नद्रव्ये शोषून घेते. त्यामुळे जास्त उत्पादनासाठी संतुलित रासायनिक खतांचे व्यवस्थापन (Management of chemical fertilizers) करणे गरजेचे आहे. मका पिकासाठी खताचे नियोजन कसे करावे? (How to plan fertilizer for maize crop?)
• मका पिकाला सुरवातीपासून ते दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राचा पुरवठा आवश्यक असतो. परंतु अतिरिक पाण्यामुळे किंवा इतर कारणांमुळे नत्राचा निचरा होतो म्हणून नत्रयुक्त खतमात्रा विभागून द्यावी लागते. परंतु स्फुरद आणि पालाश युक्त खते पेरणीच्या वेळी संपूर्ण मात्रा द्यावी.
• यामध्ये सुरुवातीला मुख्य अन्नद्रव्यांच्या पुरवठयासाठी सुपर फॉस्फेट, डीएपी, १०:२६:२६, म्युरेट ऑफ पोटॅश यांसारख्या खतांचा वापर करावा. तसेच उभ्या पिकात खत देताना युरिया, १९:१९:१९ २४:२४:००, २०:२०:०:१३ यांसारख्या रासायनिक खतांचा वापर करावा.
• तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंक आणि बोरॉन ची कमतरता दिसून येते यासाठी पेरणीच्या वेळी झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा पीक वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत चिलेटेड झिंक आणि बोरॉन ची वेगवेगळ्या वेळी फवारणी करावी. जेणेकरून मका कणीसातील दाणे पूर्णपणे भरतील.
• मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे.
• खरीप हंगामात (kharif season) सगळीकडे एकसारखा पाऊस होत नसल्याने बहुतेक शेतकरी (farmer) जिरायती मकाची पेरणी करतात. त्यामुळे पिकास योग्य कालावधीत पाणीपुरवठा होत नाही. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे.
——————————————————————————-
——————————————————————————-

• मका पिकातील महत्वाच्या पाणी देण्याच्या अवस्था पुढीलप्रमाणे आहे.

 

1. रोपावस्था – पेरणीनंतर सुरुवातीचे २५ ते ३० दिवस .बियाण्याची उगवण होऊन रोपाची वाढ होण्यासाठी जमिनीत या अवस्थेत वाफसा असणे गरजेचे आहे.
2. वृद्धिकाळ – उगवणीनंतर ३५ ते ४० दिवसांचा या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून पाचव्या पेऱ्यापर्यंत दुय्यम मुळे निघतात व ती जमिनीत रुजतात. त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडाची जोमदार वाढ होऊन पानांची पूर्णपणे निर्मिती होते.
3. फुलोरा अवस्था – उगवणीपासून ४५ ते ६० दिवसापर्यतचा हा काळ आहे. तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया या १५ दिवसापर्यत सुरू राहते.
4. कणसे लागण्याचा कालावधी – तुरा बाहेर पडल्यानंतर २-३ दिवसात प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसरबाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते.
कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे ५० ते ७० दिवस पर्यतचा असतो. बीजधारणा झाल्यावर कणसात दाणे भरण्यास सुरूवात होते.
5. दुधाळ अवस्था – दाणे भरताना प्रथमत: दाणे पक्क न होता हुरडा होण्याचा काळ. हा काळ साधारणत: ४ ते ५ आठवड्याचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रियवाढ (८५ % पर्यत) होते. मका पिकासाठी खताचे नियोजन कसे करावे?
संदर्भ:- ऍग्रो स्टार

Leave a Comment