कमी खर्चात,घ्या ‘झेंडू’ चे पिक : वाचा संपूर्ण माहिती

कमी खर्चात,घ्या ‘झेंडू’ चे पिक : वाचा संपूर्ण माहिती
 
झेंडू पिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनींत आणि निरनिराळ्या प्रकारच्या हवामानात उत्तम प्रकारे घेता येते. झेंडूचे पीक महाराष्ट्रात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास दसरा-दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. उन्हाळ्यात, लग्नसराईत इतर फुले दुर्मिळ असताना झेंडूच्या फुलांचा वापर मोेठ्या प्रमाणात केला जातो. झेंडूची फुले अनेक प्रकारची असून, त्यांना विविध रंग व आकार असतात. काढणीनंतरही ही फुले चांगली टिकतात. या फुलांना थोडा उग्र स्वरूपाचा वास असतो. झेंडूच्या फुलांना नेहमीच मागणी असते.
कमी दिवसांत, कमी खर्चात, कमी त्रासात पण खात्रीने फुले देणारे पीक म्हणून झेंडूचा उल्लेख केला जातो. झेंडूच्या फुलाना भरपूर मागणी असते आणि चांगला भाव मिळतो. दसरा-दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. झेंडू हे पीक कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीतही तग धरून वाढते.
 

पालक लागवड कशी करावी पाहा सविस्तर माहिती 

 
झेंडू पिकासाठीचे खत व पाणी व्यवस्थापन
 
आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर या प्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २००किलो पालाश या प्रमाणे खते दयावी. संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, स्फुरद ४००किलो याप्रमाणे लागवडी पूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावीत.
सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणी नंतर एका आठवड्याने कार्बन ड्रेझीम २०ग्रॅम किंवा कॅप टॉप २०ग्रॅम प्रति १०लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्याचप्रमाणे अंतर प्रवाही कीटकनाशके व बुरशी नाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या द्याव्यात. हंगाम झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १०ते१५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.झेंडू  झेंडू  झेंडू
www.santsahitya.com

Leave a Comment