“मुग व उडीद पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान”

“मुग व उडीद पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान”

 
हमखास पाऊसमानाच्या प्रदेशात भारी कसदार काळ्या जमिनीत, मूग व उडीद पिके वरदान ठरलेली आहेत. खरीप हंगामात मूग आणि उडीद  या पिकांना अनन्यसाधारण महत्च आहे. या  दोन्हीही पिकांचा कालावधी फक्त अडीच ते तीन महिन्याचा असून पीक पद्धतीत या पिकांचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने या पिकांना फार महत्च आहे. त्याचप्रमाणे  शेंगा तोडणीनंतर पाला पाचोळ्यामुळे जमिनीचे पोत सुधारण्यास मदत होते  त्यामुळे फेरपालटीसाठी ही पिके उत्तम आहेत. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ` पीक पद्धतीमध्ये डाळींच्या पिकांचा समावेश करणे प्रथिनांचा १८ ते २० टक्के, मेदाचा ५६.५ टक्के पुरवठा आपणास मूग व उडीद यापासून मिळतो आणि सर्वसाधारणपणे २० टक्के ऊर्जेची गरज भागवली जाऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने प्रतिमाणसी प्रतिदिन ८५ ग्रॅम डाळीची गरज असल्याचे सांगितले आहे.
तथापेि भारतात मात्र हे प्रमाण जवळपास ३६.५ ग्रॅम प्रतिमाणसी प्रतिदिन आहे. देशाची डाळीची मागणी पूर्ण करण्यासाठी डाळीची आयात करावी लागत आहे. यावरुन पीक पद्धतीमध्ये मूग आणि उडिदाची पेरणी करणे आवश्यक आहे. परंतु सध्या मूग व उडीद पिकांची उत्पादकता ही चार पटीने कमी आहे. मुग व उडीद पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान
माहिती पहा व्हिडीओ स्वरूपात 

 

मूग व उडीद पिकांची उत्पादकता कमी असल्याची कारणे 

 1. खरीप हंगामामध्ये अनियमित पडणारा पर्जन्यमान
 2. या पिकासाठी जमिनीची अयोग्य निवड
 3. रायझोबियम व स्फुरद विद्राव्य जिवाणूंची प्रक्रिया केली जात नाही.
 4. नेिविष्ठांचा अपुरा वापर उदा. पिकांना लागणारे प्रमाणित बियाणे, खतांची मात्रा. इ.
 5. प्रतिहेक्टरी झाडांची योग्य संख्या राखली जात नाही.
 6. एकात्मिक कोड व रोग व्यवस्थापनाचा अभाव
 7. आंतरमशागत वेळेवर न करणे
 8. सुधारित तंत्रज्ञानाचा अभाव

जमीन व पूर्वमशागत 

मूग व उडीद ही दोन्हीही पिकांच्या लागवडीकरिता योग्य नेिचन्याची मध्यम ते भारी जमीन निवडावी. हलक्या प्रतीची मुरमाड तसेच चोपण व पाणथळ जमीन या पिकास योग्य नाही. हे पीक पाणी साठवून ठेवणाच्या जमिनीत घेऊ नये. पूर्वीचे पीक निघाल्यावर उन्हाळ्यात खोल नांगरट करून मृगाचा पहिला मोठा पाऊस झाल्यावर वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणी अगोदर १५ ते २० गाड्या शेणखत हेक्टरी जमिनीत  मिसळावे.

पेरणीचा कालावधी

ही दोन्हीही पिके पाऊस पडल्यानंतर व जमिनीत वाफसा आल्याबरोबर लवकरात लवकर पेरावीत या पिकाची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या / पहिल्या आठवड्यात करावी. पेरणीस जस जसा उशीर होईल, तस-तसा त्या प्रमाणात उत्पादनातही घट होत जाते.

बियाणाचे प्रमाण व बीजप्रक्रिया

या पिकाची योग्य अशी हेक्टरी रोपांची संख्या राखण्याकरिता १२ ते १५ केिली बियाणे पुरेसे आहे. पेरणीपूर्वी बियाणास बाविस्टीन १ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम चोळावे. तसेच ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रतिकेिली या प्रमाणात बियाणास बीजप्रक्रिया केल्यास बुरशीजन्य (जसे भुरी व मूळकुज) रोगापासून पिकांचे संरक्षण होते. त्याचबरोबर १o केिली बियाणास रायझोबियम जिवाणू संवर्धक व पीएसबी प्रति २५० ग्रॅम लावून पेरणी करावी.

पेरणीचे अंतर

या दोन्हीही पिकांची लागवड करताना महत्वाचे म्हणजे, हेक्टरी रोपांची संख्या योग्य राखण्याकरिता दोन ओळीतील अंतर ३o तर दोन रोपांतील अंतर १o सें.मी. असावे. मात्र जास्त तणग्रस्त व सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असणा-या जमिनीत आंतरमशागतीच्या सोयीनुसार दोन ओळीत ४५ सें.मी. अंतर वाढ़वावे.

सुधारित वाण

मूग आणि उडीद या दोन्हीही पिकांमध्ये विविध सुधारित वाण विकसित करुन प्रसारित केले. तर अधिक फायद्याच्या प्राप्तीकरिता शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी. या मध्ये टपोरे दाणे असलेले, रोग प्रतिकारक्षम व अधिक उत्पादन देणारे वाण कृषि विद्यापीठाद्वारे विकसित केलेले आहेत. त्याची लागवड करावी.

मुगाच्या सुधारित जाती

 1. कोपरगांवः हे वाण म.फु.कृ.वि. राहुरी येथून १९४३ साली प्रसारित झाले. हा वाण ६५ ते ७0 दिवसामध्ये तयार होतो. मर व करपा (ब्लाईट) तसेच पिवळा केवडा रोगास प्रतिकारक आहे. हा वाण मध्यम आकाराचा हिरव्या रंगाचा व चमकदार असून १oo दाण्याचे वजन ३ ते ३.२ ग्रॅम असते. या वाणाचे सरासरी उत्पादन ९ ते १o क्रॅिटल
 2. बीएम ४: हे वाण कृषि संशोधन केंद्र, बद नापूर(वनाम.कृ.वि.परभणी) येथून सन  १९९१ ला प्रसारित करण्यात आले. हा वाण करपा व मुरी रोगास प्रतिकारक ) असून ६५ ते ६७ दिवसंमध्ये काढणीस येतो. या वाणाची शिफारस मध्य भारतासाठी करण्यात आली आहे. दाणे मध्यम आकाराचे असून १oo दाण्यांचे वजन ३ ते ३.२ ग्रॅम आहे. ‘कोपरगांव’ या वाणाच्या तुलनेत शेंगाच्या टोकाकडील भागास शेंगा गुच्छमध्ये लागतात. शेंगावर थोड्या प्रमाणात लव असते. या वाणाचे सरासरी उत्पादन ९ ते ११ क्रॅिटल प्रति हेक्टरी मिळते.
 3. बीपीएमआर १४५ : हा वाण कृषि संशोधन केंद्र, बदनापूर(व.ना.म कृ.वि.परभणी) येथून सन २oo१ मध्ये प्रसारित करण्यात आला. हे वाण ६० ते ६५ दिवसात परिपक्र होऊन ७ ते ८ फ्रेिंटल प्रति हेक्टरी उत्पादन देते. हे वाण भुरी, करपा व पिवळा केवडा या रोगास प्रतिकारक आहे. या वाणाचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे शेंग लांब असून दाणे हे मोठ्या आकाराचे, चमकदार असतात आणि १oo दाण्यांचे वजन ३.o ते ३.४ ग्रॅम एवढे आहे. या वाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण २० टक्के आहे. हे वाण उंच वाढत असून त्याची पानेअरुंद असतात .
 4. बीएम २00२-१ : हे वाण कृषि संशोधन केंद्र,बदनापूर येथून सन २oo५ मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आले. हा वाण ६५ ते ७o दिवसात काढणीस येत असून त्यापासून प्रति हेक्टरी ७-९ क्रॅिटल उत्पादन मिळते. या वाणाचे दाणे टपोरे हिरवे असून १oo दाण्यांचे वजन ३.७५ ग्रॅम एवढे आहे, या वाणाचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा वाण काढणीस एकाच वेळी येतो. शेंगा टोकदार व केसाळ असून जमिनीकडे झोपळलेल्या असतात. हा वाण मुरी रोगास प्रतिकारक आहे.
 5. बी.एम २003-0२ : हे वाण कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथून सन २o१o मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आले. हा वाण ६५ ते ७० दिवसात काढणीस येत असून त्यापासून प्रति हेक्टरी ८ ते १० फ्रेिंटल उत्पादन मिळते. या वाणाचे दाणे टपोरे हिरवे असून १oo दाण्याचे वजन ४,५o ग्रॅम एवढे आहे. या वाणाचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा वाण काढणीस एकाच वेळी येतो. शेंगा लांब असून दाणे मोठ्या आकाराचे व चमकदार असतात,
 6. फुले मूग २ : हा वाण ६० ते ६५ दिवसात येणारा असून त्याचे उत्पादन १o ते १२ क्रिटल/हे, असे आहेत. या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे व हिरव्या रंगाचे आहे. हा वाण खरीप व उन्हाळी हंगामासाठी योग्य असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी प्रसारित केलेला आहे.
 7. पीकेव्हीएकेएम४: हा वाण डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केलेला असून अधिक उत्पादन देणारा, मध्यम आकाराचे दाणे असणारा, एकाच वेळी पक्रता येणारा तसेच बहुरोग प्रतिकारक असुन संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस केलेला आहे. हा वाण ६५ ते ७ व दिवसात येणारा आणि १२ ते १५ फ्रेिंटल प्रति हेक्टरी उत्पादन देणारा आहे.

उडिदाच्या सुधारित जाती

 1. बीडीयु १ : हे वाण कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथून सन २००१ मध्ये प्रसारित करण्यात आले. हा वाण मुरी रोगास प्रतिकारक असून महाराष्ट्रासाठी शिफारस केला आहे. दाणे हे मध्यम काळ्या रंगाचे व टपोरे 27 असून १oo दाण्याचे वजन ४.५ ते ५.o  ग्रॅम एवढे असते. या वाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण १९ टक्के इतके असून तो ७० ते ७५ दिवसात काढणीस येतो. हा वाण मध्यम उंच वाढणारा असून पाने अरुंद व खोड जांभळ्या रंगाचे असते. शेंगा काळ्या व चोपड्या असून त्यावर कमी प्रमाणात लव असतो. या वाणाचे सरासरी उत्पादन ११-१२ फ्रेिंटल प्रति हेक्टरी मिळते.
 2. टिएयु-१ : हे वाण डॉ.पं.दे.कृ.वि. अकोला व बी.ए.आर.सी मुंबई यानी संयुक्तपणे सन १९८५ मध्ये प्रसारित केला आहे. हा वाण ७० ते ७५ दिवसात काढणीस तयार होतो. हा वाण मुरी रोगास प्रतिकारक आहे. शेंगा काळी व चोपडी असून दाणे मध्यम आकाराचे असतात आणि १oo दाण्याचे वजन ३.५ चे ३.८ ग्रॅम इतके असते. या वाणांमध्ये १९ ते २० टक्के प्रथिने आढळून येतात. या वाणाचे उत्पादन १० ते १२ फ्रेिंटल प्रति हेक्टरी आहे.
 3. टीपीयु-४: हा वाण ६५ ते ७o दिवसांमध्ये काढणीस तयार होतो. हे वाण लवकर तयार होणारे असून महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यासाठी शिफारस केले आहे. या वाणाचे दाणे काळे टपोरे असून प्रति हेक्टरी १o ते ११ क्रॅिटल उत्पादन मिळते.

खत व्यवस्थापन

या पिकांच्या मुळाद्वारे नत्र स्थिरीकरण चांगले व्हावे आणि मुळाची वाढ योग्य होण्याकरिता जमिनीची मशागत करतेवेळी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत व्यवस्थित मिसळावे. तसेच पेरणीच्या वेळी हेक्टरी २0 किलो नत्र व ४० किलो स्फुरद याप्रमाणे खत मात्रा द्यावी. म्हणजे युरिया ४० किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट २५० किलो किंवा डी.ए.पी.८७ किलो अधिक ११ किलो युरिया प्रति हेक्टरी द्यावे.

आंतरमशागत

पेरणीनंतर सुरुवातीच्या एका महिन्यात तण नियंत्रणासाठी १ खुरपणी व २ कोळपण्या कराव्यात, कारण तणनियंत्रण १ महिन्यापर्यंत न झाल्यास नुकसान मोठ्या प्रमाणात होते.

आंतरपीक पद्धतीचा वापर

आंतरपीक म्हणून या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे. या पिकांच्या कालावधीमुळे हे दोन्हीही पिके तूर, ज्वारी, कपाशीत आंतरपीक म्हणून घेता येतात.

रोग व कोड नियंत्रण moong

मूग पिकावर विशेष करून भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो. हा प्रादुर्भाव टाळण्याकरिता मुगासाठी बी.पी.एम.आर. १४५, बीए ४ व बीएम २oo३-०२ तसेच उडिदासाठी टीएयु-१, बी.डी.यु-१ अशा रोगप्रतिकारक्षम वाणाची लागवडीकरिता निवड करावी. सततच्या पावसाच्या झडीनंतर एकदम ७ ते ८ दिवस पावसाने दडी मारून वातावरण दमट असल्यास भुरी रोग येण्याची शक्यता दाट असते. फुलांच्या पूर्वी अथवा पीक फुलो-यात असताना भुरी रोग आल्यास नुकसान जास्त प्रमाणात होते. अशा परिस्थितीत सल्फेक्स ०.३० टक्के किंवा २०-२२ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच ३० पोताची गंधकाची भुकटी २० किलो प्रति हेक्टरी करण्याकरिता क्लोरोपायसीफॉस २o ई सी २० मि.लेि./ दहा लिटर पाणी या कोडनाशकाची फवारणी करावी.

पीक काढणी

या पिकांची काढणी (तोडणी) योग्य वेळी करणे जरुरीचे आहे. पिकांच्या बहुतांश शेंगा पक्र झाल्यास पावसाचा अंदाज पाहून काढणी त्वरित करून तोडणी केलेल्या शेंगा व्यवस्थित पसराव्यात व पावसाने भिजणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. भुरी रोग प्रतिकारक वाणाची (बीपीएमआर १४५) काढणी करताना काही शेंगा उशिरा लागतात. त्याकरिता शेंगाची तोडणी ही पावसाच्या अंदाज घेऊन उरकावी. तोडणी केलेल्या शेंगा उन्हात वाळवून काठीने बुडवून किंवा ट्रॅक्टरने मळणी करून खेळत्या हवेच्या वातावरणात साठवाव्यात.

हेक्टरी उत्पादन

वरील सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून या पिकांची लागवड केल्यास १0 ते १२ क्रिटल प्रति हेक्टरी उत्पादन अपेक्षित आहे. सध्या मूग आणि उडिदाला असणारा बाजारभाव लक्षात घेता ही पिके कमी कालावधीत अधिक फायदा देणारी आहेत.

उत्पादन वाढीच्या ठळक बाबी

 • मध्यम ते भारी योग्य निच-याची जमीन निवडणे. e मुगासाठी बीपीएमआर १४५, बीएम-४, बीएम २000-01, बीएम-४, बीएम २oo३-०२ आणि उडिदासाठी बीडीयू-१, टीएयु-१ या वाणांची निवड़ करणे.
 • बीज प्रक्रियेसाठी बाविस्टिन १ ते २ ग्रॅम/केि. बियाणे तसेच २५o ग्रॅम जिवाणू संवर्धक व स्फुरद विद्राव्य जिवाणू प्रति १० किलो बियाणांस चोळावे.
 • प्रतिहेक्टरी २० गाड्या शेणखत, २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि गरजेनुसार ३० किलो पालाश पेरणीपूर्वी जमिनीत चांगले मिसळावे. पाऊस झाल्याबरोबर पेरणी करावी.
 • तण नियंत्रणासाठी एक किंवा दोन खुरपण्या आवश्यक आहेत.
 • फुलो-यात आणि शेंगात दाणे भरताना पाणी आवश्यक आहे.
 • पिकांचे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कोड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
 • भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी सल्फेस ०.३० टक्के अथवा पाण्यात विरघळणारे गंधक २० ते २२ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
 • रोगाची लागण दिसताच २ ते ३ फवारण्या कराव्यात.
 • शेंगा पोखरणा-या अळींचा प्रादुर्भाव दिसू लागताच क्लोरोपायरीफॉस २o ई सी २० मि.लेि./ १० लिटर पाणी किंवा एचएनपीव्ही २५o एलई प्रति हेक्टरी या प्रमाणे फवारणी करावी.
 • ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. मुग व उडीद पिकांचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

ref:- mr.vikaspedia.in
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment