राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत : प्लास्टिक मल्चिंगवर 50% टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत : प्लास्टिक मल्चिंगवर 50% टक्के अनुदानाचा ‘असा’ घ्या लाभ…!

 
शेतीपध्दतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहे. अत्याधुनिक पध्दतीचा वापर करुन केवळ उत्पादनवाढीसाठीच नाही तर त्यासाठी आवश्यक बाबींचाही विचार सरकारकडून केला जात आहे. ठिबक, स्प्रिंक्लर हा त्यामधलाच एक भाग आहे. पण आता फळझाडे, भाजीपाला तसेच वेगवेगळ्या पिकांभोवती अच्छादन  रहावे जेणेकरुन पाण्यचा बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास तर टाळता येतोच शिवाय किड-रोगराईपासूनही पिकाचे संरक्षण होते. अलिकडच्या काळात या प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होत आहे. शिवाय  नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टळत आहे. विशेष: भाजीपाल्यासाठी याचा वापर वाढत आहे. वाढता वापर लक्षात घेता शेतकऱ्यांना याची खरेदी योग्य दरात करता यावी म्हणून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जात आहे.
केंद्र आणि राज्यसरकारच्या वतीने विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात नाही. शिवाय त्याबद्दल अधिकची माहिती नसते. त्यामुळेच प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी असलेल्या 50 टक्के अनुदानाचा लाभ कसा घ्यावयाचा याची काय वैशिष्टे आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.

प्लास्टिक मल्चिंगसाठी कसे आहे अनुदान (mulching paper subsidy in maharashtra)

या पेपरच्या वापरामुळे पिकांमध्ये तण वापले जात नाही. शिवाय किड-रोगराईचा प्रादुर्भावही होत नाही. सर्वसाधारण क्षेत्रसाठी प्रति हेक्टरी वापरासाठी 32000 रुपये खर्च येत असून या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत या खर्चाच्या 50 टक्के जास्तीत-जास्त रुपये म्हणजेच 16000 प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदान दिले जाते. तर डोंगराळ भागासाठी खर्च हा 36800 ठरवून याच्या 50 टक्के रक्कम ही अदा केली जाते. यामध्ये शेतकरी वैयक्तिक लाभ घेऊ शकतो तसेच शेतकरी समूह, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, सहकारी संस्था यांना अर्थसहाय्य केले जाते.
 हे पण वाचा:- रब्बी हंगामातील पिक विमा भरण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा!

ऑनलाईन नोंदणी करतांना आवश्यक असणारे कागदपत्रे

ऑनलाईनसाठी सर्वप्रथम (https://mahadbtmahait.gov.in) या ऑनलाईन संकेतस्थळावर नोंदणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणीसाठी 7/12, 8अ, आधार कार्डची झेरॅाक्स, आधार कार्ड हे बॅंकेशी संलग्न असल्याच्या पासबुकची झेरॅाक्स असणे आवश्यक आहे.

पिकांप्रमाणे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा असा करा वापर

3-4 महिने कालावधी असलेल्या पिकासाठी 25 मायक्रॅान जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर गरजेचा आहे. यामध्ये भाजीपाला,स्ट्रॉबेरी यासरख्या पिकांना संरक्षण देता येते. तर मध्यम कालावधी म्हणजे 11 ते 12 महिन्यांच्या फळपिकांसाठी 50 मायक्रॅान जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर उपयोगी ठरणार आहे. तर त्यापेक्षा जास्त कालावधी असलेल्या पिकांसाठी 100/200 मायक्रॅान जाडीचे यु. व्ही. स्टॅबिलाइज्ड फिल्मचा पेपर घेतला तर अधिकचे फायद्याचे राहणार आहे.

असा करा पाठपुरावा

शेतकऱ्यांनी हॉर्टनेट प्रणालीवर अर्ज नोंदणी केल्यानंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे वरिल कागद पत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांचेकडून पूर्व संमती मिळाल्यानंतर मल्चिंग फिल्म खरेदी करावी. अनुदानाची रक्कम ही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी स्तरावरून PFMS प्रणालीद्वारे थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान जमा होते.
source:- tv9 marathi

Leave a Comment