नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? भरपाईसाठी असा करा अर्ज आणि ‘या’ गोष्टीचा मिळवा लाभ

नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? भरपाईसाठी असा करा अर्ज आणि ‘या’ गोष्टीचा मिळवा लाभ
 

केंद्र सरकारने वादळ, पूर, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटात शेतकर्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)’ सुरू केलीय.

 
केंद्र सरकारने वादळ, पूर, गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY)’ सुरू केलीय. या योजनेसाठी शेतकऱ्यांना कमी आणि एकसारखा प्रीमियम भरून नुकसान भरपाई मिळते. पीएमएफबीवाय पेरणीच्या आधीपासून ते पिकाच्या काढणीनंतरही संरक्षण देते. या योजनेत पेरणीपासून काढणीपर्यंतच्या हंगामात कोणत्याही नैसर्गित संकटात शेतीचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई मिळते

नुकसान भरपाई मिळवण्यासाठी 72 तासात माहिती देणं आवश्यक

भारतीय कृषी विमा कंपनीने या विमा योजनेबाबत ट्वीट करत माहिती दिलीय. या विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांना नैसर्गित संकटानंतर 72 तासाच्या आत संबंधित कंपनीला नुकसान झाल्याची माहिती द्यावी लागेल.
भूस्खलन, पूर, गारपीट, नैसर्गिक आग, ढगफुटी यामुळे उभ्या पिकाचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या पिक विम्यातून नुकसान भरपाईसाठी दावा करता येईल. चक्रीवादळ, बेमोसमी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकाच्या काढणीनंतरही नुकसान झालं तरी या विम्याचं संरक्षण मिळतं. दोन्ही परिस्थितीत शेतकऱ्यांना 72 तासाच्या आत कंपनीला माहिती देणं बंधनकारक आहे.

विम्या अंतर्गत नुकसान भरपाई कशी मिळवायची?

या योजने अंतर्गत विम्याचा दावा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यासाठी शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकारे अर्ज करु शकता. राज्य सरकार रब्बी आणि खरीप हंगामात पीएम फसल बीमा योजनेची जाहिरात प्रकाशित करते. ही विमा योजना ऐच्छिक आहे.

PMFBY चा अर्ज कोठे मिळेल?

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत जाऊन अर्ज घेता येतो. याशिवाय हा अर्ज ऑनलाईन पद्धतीनेही भरता येतो. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या pmfby.gov.in या अधिकृत वेबसाईटवर हा अर्ज मिळेल.

विम्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?

  1. विमा घेणाऱ्या व्यक्तीचा फोटो
  2. विमा घेणाऱ्याचं ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड आणि पासपोर्ट यापैकी कोणतंही एक)
  3. रहिवासी पुरावा (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड आणि पासपोर्ट यापैकी एक)
  4. शेतीचा 7/12, 8 अ
  5. शेतीतील पिकाचा पुरावा (तलाठी, सरपंच यांच्यापैकी कुणाचंही प्रमाणपत्र/पंचनामा)
  6. विम्याचे पैसे थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होतात. ज्या खात्यात पैसे जमा करायचे आहे त्या खात्याचा कॅन्सल चेक

संदर्भ:- TV9 Marathi
—————————————————————————————————————————————-
हे पण वाचा:- केंद्रीय कृषी मंत्रालयाचा निर्णय भारतातील शेतकऱ्यांना ‘यूनिक किसान आयडी’ क्रमांक मिळणार
हे पण वाचा:- “कुक्कुटपालन पावसाळ्यातील-व्यवस्थापन”
—————————————————————————————————————————————–
मिळवा शेती विषयक माहिती, हवामान अंदाज, तसेच शेतमालाच्या खरेदी-विक्रीची माहिती मोफत मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या WhatsApp गृपला जॉईन व्हा
टीप:- फक्त तुमच्याच जिल्ह्यात जॉईन व्हा 
https://www.krushikranti.com/whatsapp-groups/
 
आमच्या संत साहित्य या वेबसाईटला नक्की भेट द्या

Leave a Comment