लॉकडाउनचा काळ शेतकऱ्यांना नवीन मार्ग व संधी उपलब्ध करून देऊ शकतो

लॉकडाउनचा काळ शेतकऱ्यांना नवीन मार्ग व संधी उपलब्ध करून देऊ शकतो.
आज ची परिस्थिती पाहता शेतमालाचे व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा झाला आहे.शेतकऱ्यांनकडे मुबलक माल उपलब्ध आहे पण लॉकडाउन मुळे तो ग्राहकांकडे पोहचत नाही.शेतमालाची नासाडी होत आहे आणि मालाला भाव देखील भेट नाही.
लॉकडाउनचा काळ शेतकऱ्यांना नवीन मार्ग व संधी उपलब्ध करून देऊ शकतो.
काल पर्यंत जे शेतकरी सर्व माल मार्केट मध्ये विकत होते आता ते शक्य होत नाही, तसेच अडचणी येत आहेत. या वर पुढील प्रमाणे मात करता येऊ शकते.
या साठी शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.येथे गाव पातळीवर काम करणे गरजेचे आहे.सर्व गावातील शेतकरी आपला वेगवेगळा शेतमाल एकत्र करतील. व एका गाडीत तो माल घेऊन शहराच्या ठिकाणी विक्रीसाठी आणतील. शहरातील विविध भागात तो माल स्वतः शेतकरी त्याच गाडीतून विकतील.येथे शेतकऱ्यांनी आपला ग्राहक पक्का करणे गरजेचे आहे.थोडक्यात ज्या प्रमाणे दूध उत्पादक शेतकरी आपले ग्राहकाना उत्तम सेवेतून आपले दूध विकतात तसेच शेतकऱ्यांना देखील आपले ग्राहक नक्की करण्याची संधी लॉक डाउन देत आहे.
 

विविध शेतकरी व विविध शेतमाल (गाव पातळी/ शेजारची गावे)

|

गाडी करून माल शहरात/तालुका/गाव मध्ये विक्री साठी आणणे

|

सर्व शहरात गाडी फिरवणे व माल विकणे 

|

ग्राहक नक्की करणे, त्यांचा मोबाइल नंबर घेऊन अविरत विश्वसनीय सेवा देण्याची हमी देने

|

ही सेवा अशीच (लॉकडाउन नंतर)चालू ठेवणे

 
फायदे:

  • माल थेट शेतकरी ते ग्राहक पोहचेल
  • एक हाती मालामुळे संसर्गाची भीती कमी होईल
  • भाव ठरवण्याचा अधिकार शेकऱ्याला राहील
  • शेतमाल उत्तम भाव भेटेल
  • ग्राहक वर्ग नक्की होईल
  • शेतमालाचे व्यवस्थापन सोयीस्करपणे होईल
  • निश्चित आर्थिक भरभराट होईल

तोटे व त्यावर उपाय:

  • शेतमाला हा वर्षभर नसतो त्यामुळे अनेक गावांचे संगठना करून गरज लक्ष्यात घेऊन नियोजन शक्य होईल
  • शेतमाल जास्त व ग्राहक वर्ग कमी. अश्या परिस्थिती मध्ये इतर शहराच्या संगठनांशी ताळमेळ तसेच शेतमाला घेणाऱ्या कंपन्यांना संपर्क करून त्यांनी गरज भागवणे शक्य आहे.

वरील साखळीत व्यापारी वर्ग सहभागी होऊ शकतो.व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनच्या बांदा वरून माल उचलून थेट ग्राहकापर्यंत पोहोचवणे जेणेकरून ग्राहकांना उत्तम शेतमाल भेटेल.
हे मार्ग अवलंबल्यास सर्व अडचणींवर मात करत शेतकऱ्यांचे दिवस नक्की चांगले येतील हा विश्वास आहे.या मध्ये काही उणीव असू शकते परंतु बदल करून एक नवीन मार्ग शोधण्याची आज गरज आहे.
 
प्रा. किरण अरुण सुपेकर
Krushikranti.com
9423429242
आपले मत खालील comment box मध्ये नोंदवा
 

1 thought on “लॉकडाउनचा काळ शेतकऱ्यांना नवीन मार्ग व संधी उपलब्ध करून देऊ शकतो”

Leave a Comment