Onion decision : गुजरात सरकारचा कांदा रेट संदर्भात मोठा निर्णय, मग महाराष्ट्रात का नाही ?
कांदा खरं पाहता एक नगदी पीक मात्र असे असले तरी त्याच्या दराबाबत कायमच संभ्रमावस्था शेतकरी समवेतच व्यापारी वर्गात बखायला मिळते. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. कांदा दराचा लहरीपणा बघता या नगदी पिकाला बेभरवशाचे पीक म्हणून संबोधले जाते.
दोन महिन्यांपूर्वी 3500 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणारा कांदा आता चक्क 500 ते 600 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत आहे यामुळेच कांद्याला बेभरवशाचे पीक म्हणून शेतकरी बांधव संबोधत असतात. कांद्याच्या दरात होत असलेल्या चढ-उताराचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. यामुळे आता गुजरात सरकारने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार गुजरात सरकार आता कांदा या नगदी पिकावर दोनशे रुपये प्रति क्विंटल सबसिडी देणार आहे. यामुळे जे आपले शेजारी राष्ट्र गुजरात मध्ये झाले ते महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करीत आहेत. एवढेच नाही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने गुजरात मधील निर्णयाचे स्वागत करीत महाराष्ट्रात देखील असा निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा देखील केला आहे.
हे पण वाचा:- Milk Rate : दूध उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानी, रेट वाढले तरी उत्पादकांची निराशा कायम
संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी तर मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहीत कांद्याला 500 रुपये प्रतिक्विंटल दराने सबसिडी दिली जावी अशी मागणी देखील केली आहे मात्र ही मागणी अजूनही पांढऱ्या कागदावरचं मर्यादित आहे त्यामुळे या मागणीला कधी मूर्त रूप प्राप्त होते हे विशेष बघण्यासारखे असणार आहे.
संदर्भ:- कृषी जागरण
लेखक:- अजय वसंत शिंदे
सरकारकडे त्यांच्या मंत्र्यांना आणि त्यांना मजा मारायला पैसे आहेत शेतकऱ्यांना आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांच्याकडे तिजोरीमध्ये खडखडाट आहे दळभद्री महा आघाडी सरकार