Onion Rate : ‘या’ कारणामुळे कांदा दारात घसरण!

Onion Rate : ‘या’ कारणामुळे कांदा दारात घसरण!

 
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्ह्यातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. देशातील इतर प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांद्याची आवक वाढल्याने पुणे जिल्ह्यातील मंचर एपीएमसी समवेतच राज्यातील अनेक प्रमुख बाजारपेठेत कांद्याच्या भावात घसरण बघायला मिळतं आहे.
गुरुवारी मंचर एपीएमसीमध्ये कांद्याला सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला. गुरुवारी मिळालेला बाजार भाव हा आधीच्या लीलावा पेक्षा दोनशे रुपयांनी कमी होता. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. मंचर एपीएमसी पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाची कांद्याची बाजारपेठ आहे. या बाजार समितीतील कांदा राज्यांतर्गत तसेच देशांतर्गत प्रमुख बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जातो.
हे पण वाचा:- शेतकरी अपघात योजना राज्यात पुन्हा सुरुवात!
मंचर एपीएमसी म्हणते आठवड्यातून तीन दिवस लिलाव होतो, रविवार गुरुवार आणि मंगळवार या तीन दिवशी या एपीएमसीमध्ये कांद्याचा लिलाव होत असतो. सध्या बाजार समितीत नवीन कांद्याची आवक होत आहे, शेतकरी बांधव कांदा काढणी केल्याबरोबरच बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत, त्यामुळे कांदा चांगले वजन देत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा देखील होत आहे.
हे पण वाचा:- महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?
मात्र, गुरुवारी झालेल्या लिलावात कांद्याचे बाजार भाव 200 रुपये प्रति क्विंटलने खाली आलेत आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र यावेळी बघायला मिळत आहे.
source:- tv9 marathi

Leave a Comment